शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Good News; सोलापुरातील कोरोना ग्रस्तांच्या सेवेसाठी आता ‘रोबोट’

By appasaheb.patil | Updated: May 6, 2020 14:47 IST

रेल्वे हॉस्पीटलची निर्मिती; औषध, गोळ्यासह जेवणही पोहचविणार

ठळक मुद्देदेशासह संपूर्ण जगात कोरोना या विषाणूजन्य आजाराने चांगलेच थैमान घातलेकोरोनाला हरविण्यासाठी देशातील सर्वच यंत्रणा अहोरात्र काम करीत आहेत़गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच पातळीवर विविध उपाययोजना

सोलापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर उपयोग करून रेल्वे प्रशासनाने सोलापुरातील ‘कोरोना’ग्रस्त रूग्णांच्या सेवेसाठी रोबोटची निर्मिती केली आहे़ हा रोबो उपचार घेत असलेल्या रूग्णांना औषधे, गोळ्यांसह जेवणही पोहचविणार आहे़ आता सोलापुरातही उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित होत असल्याने सोलापूरचा नावलौकिक होत आहे़ रेल्वेने तयार केलेला हा देशातील पहिलाच रोबोट असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

देशासह संपूर्ण जगात कोरोना या विषाणूजन्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे.  कोरोनाला हरविण्यासाठी देशातील सर्वच यंत्रणा अहोरात्र काम करीत आहेत. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच पातळीवर विविध उपाययोजना व तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवेनवे तंत्र विकसित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने कोरोनाग्रस्त रूग्णांच्या सेवेसाठी आता रोबोटची निर्मिती केली आहे. सोलापूर रेल्वे विभागातील यांत्रिक विभागाने अवघ्या तीन दिवसांत हा रोबोट तयार केला आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या आयओएच डेपो मध्ये हा विकसित झाला. ही माहिती रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आनंद कांबळे यांनी सांगितले. हा रोबोट मंगळवार ५ मे रोजी भैय्या चोकातील रेल्वे हॉस्पीटलमध्ये दाखल झाला आहे़ हा रोबोट मोबाईलव्दारे आॅपरेट करण्यात येणार आहे़ याशिवाय रूग्णांच्या नातेवाईकांशीही व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवादही साधण्यासाठी हा रोबो मदत करणार आहे़ रोबोटमुळे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी,नर्स, सफाई कामगार यांना कोरोना रुग्णाच्या संपर्कात येऊन लागण होण्याची शक्यता कमी होण्यास मदत झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाºयांची चिंता कमी करणारी ही बाब ठरणार आहे.-----------------रूग्णांचे मनोर्धर्य वाढविण्यासाठी रोबो साधणार संवादकोरोना बाधित रुग्णांची स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी दरवेळेस डॉक्टरांना वॉर्ड मध्ये येण्याची गरज भासणार नाही. रोबोट कोरोना बाधित रुग्णांना औषधे देणार आहे. यात आॅडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असल्याने त्याद्वारे तो रुग्णांशी संवाद साधणार आहे.  रोबोटद्वारे डॉक्टर रुग्णांवर नजर ठेवू शकतील. रुग्णांचे मनोधैर्य खचू नये म्हणून रोबोट त्यांच्याशी संवाद साधणार असून प्रसंगी नातेवाईकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलू आणि पाहू ही शकणार आहे.----------------रोबोटमुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांना कोरोना बाधित कर्मचाºयांच्या संपर्क कमीत कमी येईल. परिणामी डॉक्टर व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होईल. २४ तास रोबोट रुग्णांची सेवा करणार आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाºयांंवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे. एकूणच रोबोट कर्मचाºयांना बºयाच आजारापासून दूर ठेवणार आहे.डॉ. आनंद कांबळे,प्रमुख, रेल्वे हॉस्पीटल, सोलापूर---------------रेल्वेतील कोरोना बाधित रूग्ण लवकर बरे होतीलसोलापूर शहरात आढळून आलेले १९ कोरोना बाधितांवर रेल्वेच्या हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत़ या रूग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रेल्वे हॉस्पीटलचे सर्व वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करीत आहेत़ शिवाय वेळेवर सकस आहार, गोळ्या, औषधोपचार, स्वच्छतेबाबतची काळजी, रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विविध उपाययोजना, कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ रेल्वे हॉस्पीटलमधील कोरोना बाधित रूग्ण लवकरच कोरोनावर मात करून घरी परततील असा विश्वास मध्य रेल्वे सोलापूर मंडलचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला़

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRobotरोबोट