शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

तिघांचा खून करून पोलिसांवरील हल्ला करणारा दरोडेखोर जेरबंद, सोलापूर ग्रामीण पोलीसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 12:59 IST

मोहोळ शहरात १५ दिवसांपूर्वी सोड्डी (ता. मंगळवेढा) येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिघा पोलीस कर्मचाºयांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविलेला आणि पळून जाताना मार्गात आडवा आलेल्या अबूपाशा कुरेशी (वय ४८, रा. मोहोळ) यांचा भोसकून खून करणाºया दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परभणी येथून अटक केली.

ठळक मुद्देया आरोपीस आज येथे आणून मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याला ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मोहोळ न्यायालयाने दिला.छग्या उर्फ छगन गंगाराम शिंदे (वय २८,रा. जामगाव खुर्द, ता. मोहोळ) असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. या कामगिरीबद्दल  पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी गुन्हे शाखेला विशेष बक्षीस जाहीर केले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ :  मोहोळ शहरात १५ दिवसांपूर्वी सोड्डी (ता. मंगळवेढा) येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिघा पोलीस कर्मचाºयांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविलेला आणि पळून जाताना मार्गात आडवा आलेल्या अबूपाशा कुरेशी (वय ४८, रा. मोहोळ) यांचा भोसकून खून करणाºया दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परभणी येथून अटक केली. या आरोपीस आज येथे आणून मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याला ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मोहोळ न्यायालयाने दिला.छग्या उर्फ छगन गंगाराम शिंदे (वय २८,रा. जामगाव खुर्द, ता. मोहोळ) असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. या कामगिरीबद्दल  पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी गुन्हे शाखेला विशेष बक्षीस जाहीर केले.दरोडेखोरांनी सोड्डी (ता. मंगळवेढा) येथे पाच घरांवर दरोडा टाकत कस्तुराबाई रामण्णा बिराजदार (वय ६५) यांचा खून करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले होते. त्याशिवाय या प्रकरणातील मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार यांचा दगडाने खून केला.  या दरोडेखोरांच्या शोधार्थ अनेक पथके कार्यरत होती. त्यापैकी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक दरोडेखोरांच्या मार्गावर होते. आपल्या पथकासह हे पथक मोहोळमधील शिवाजी चौकात दाखल झाले. तेथे तिघांना पकडण्यासाठी जात असताना त्यांनी पोलिसांच्या दिशेने चाकूने वार केले. त्यानंतर त्या ठिकाणी उभ्या असलेल्या अबूपाशा कुरेशी (वय ४८, रा. मोहोळ) यांच्यावरही दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अबूपाशा यांचा मृत्यू झाला होता.दरोडेखोर वैजिनाथ भोसले याला घटनास्थळीच पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली होती. अन्य दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले होते. आरोपी छगन हा करम शिवार गंगाखेड (जि. परभणी) येथे असल्याची माहिती मिळाली होती. २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून दरोडेखोर छगन याला अटक केली. त्यानेच मोहोळ येथे कुरेशी यांच्यावर वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. -----------------यांनी केली कामगिरीच्पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, विजयकुमार भरले, गोरक्षनाथ गांगुर्डे, पोलीस नाईक रवि माने, पोकॉ अरुण केंद्रे, सागर शिंदे, सचिन गायकवाड, बाळू चमके, राहुल सुरवसे , आनंद दिघे आदींनी केली.-----------------आठ गुन्हे दाखलच्मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोड्डी येथील खुनासह दरोडा या गुन्ह्यात दरोडेखोर छगन शिंदे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.  त्याच्यावर सोलापूर तालुका, मंगळवेढा, मंद्रुप, दक्षिण आणि उत्तर अक्कलकोट, मोहोळ येथे असे आठ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय इंडी  येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस