शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

Solapur Sancharbandi; ग्रामीण भागातील अठरा गावातील रस्ते होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 1:03 PM

सोलापूर ग्रामीण पोलिसांचे नियोजन; संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस अलर्ट

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील अकरा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात अशा अठरा गावातील रस्ते संचारबंदी काळात वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

मार्डी ते कारंबा रस्ता, मार्डी ते अकोलेकाटी फाटा, बार्शी रोड, नान्नज ते मार्डी, नान्नज ते अकोलेकाटी फाटा,  बार्शी रोड ते मार्डी, बाणेगाव ते कारंबा, बाणेगाव ते भोगाव-सोलापूर रोड, बोरामणी ते संगदरी, संगदरी ते तांदूळवाडी मार्गे सोलापूर. तिºहे ते पाथरी, पाथरी ते बेलाटी सोलापूर. नान्नज ते बीबीदारफळ, बीबीदारफळ ते अकोलेकाटी-सोलापूर रोड. कोंडी ते गुळवंची, कोंडी ते सोलापूर रोड. बक्षीहिप्परगा ते मुळेगाव तांडा, बक्षीहिप्परगा ते दहिटणे-सोलापूर. पाकणी ते शिवणी, शिवणी ते हिरजमार्गे सोलापूर आणि पाकणी ते सोलापूर. सोलापूर ते तुळजापूर महामार्गापासून कासेगाव जाणारा रस्ता, कासेगाव ते उळे मुख्य रस्ता असे बंद करण्यात आलेले रस्ते आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या