शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूच्या पक्षाघाताचा धोका वाढतोय : डॉ़ जगदीश राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 11:32 IST

सेरेब्रल पाल्सी अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार मुख्यत: लहान मुलांमध्ये जन्मजातच असतो. या आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे.या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ६ आॅक्टोबर हा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन पाळला जातो. सेरेब्रल पाल्सी हे भारतातल्या लहान मुलांमध्ये अपंगत्व येण्याचे मुख्य कारण आहे. दरवर्षी जन्माला येणाºया १००० मुलांपैकी ३ ते ...

ठळक मुद्देसेरेब्रल पाल्सी अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार मुख्यत: लहान मुलांमध्ये जन्मजातचया आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहेभारतातल्या लहान मुलांमध्ये अपंगत्व येण्याचे मुख्य कारण

सेरेब्रल पाल्सी अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार मुख्यत: लहान मुलांमध्ये जन्मजातच असतो. या आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे.या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ६ आॅक्टोबर हा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन पाळला जातो. सेरेब्रल पाल्सी हे भारतातल्या लहान मुलांमध्ये अपंगत्व येण्याचे मुख्य कारण आहे. दरवर्षी जन्माला येणाºया १००० मुलांपैकी ३ ते ५ जनांना सेरेब्रल पाल्सी हा रोग होतो.

सेरेब्रल म्हणजे मेंदू आणि पाल्सी म्हणजे अर्धांगवायू हा विकार शारिरीक हालचालीशी संबंधित असून, याच्यात स्रायूची शक्ती, त्यांचे नियमन आणि अतिरिक्त ताठरता यामुळे शरीराच्या हालचालीला मर्यादा येतात. शरीराची हालचाल ही हाडाच्या भोवती असलेल्या स्रायूमुळे शक्य होते. या रोगात स्रायू अगदी कडक होतात किंवा एकदम सैल होतात. यामुळे लहान मुलांचे त्यांच्या हालचालीवरील नियंत्रण सुटते. हालचालीवर मर्यादा येतात. ही लक्षणे स्रायूच्या झिजेमुळे नाही तर मेंदूला होणाºया हानीमुळे होतात. सेरेब्रल पाल्सी होण्यामागे अनेक बाबी कारणीभूत असू शकतात. त्यातील काही कारणे अशी आहेत. गर्भकाळ किंवा प्रसुतीदरम्यान आईला झालेला घातक जिवाणू किंवा विषाणूचा संसर्ग, मुदतीआधी जन्मलेले बालक व त्याचे वजन कमी असणे, प्रसुतीदरम्यान बाळाला होणाºया गंभीर इजा, बाळ जन्माला आल्यावर लगेच न रडता उशिरा रडणे अथवा बिल्कुलच न रडणे. ज्यामुळे की मुलामध्ये आॅक्सीजन मेंदूपर्यंत पोहोचत नाही व मेंदूला इजा होते.

एकाच वेळी दोन अथवा त्यापेक्षा जास्त मुले जन्मली तर त्यातील काही मुलांना सेरेब्रल पाल्सी असण्याची शक्यता असते. बाळाला होणारे काही रोग जसे कावीळ, मिरगीचे झटके येणे, मेंदूत पाणी जमा होणे, या रोगामुळे सुद्धा मेंदूला इजा होते. गर्भकाळात अमर्यादित उच्च रक्तदाब, मधुमेह, थॉयराईड यासारखे आजार असणे.सेरेब्रल पाल्सीची लक्षणेमूल ५ महिन्याचे होऊन देखील त्याने मान पकडलेली नसणे. मूल दहा महिन्याचे होऊनही बिना सहाºयाचे बसू न शकणे. मूल १५ महिन्याचे होऊनही ते उभे न राहणे, चालू न शकणे, चालता-चालता पडणे, मुलाचा एक हात अथवा पाय काम न करणे. शरीराचा विकास वयानुसार कमी होणे. लहान मूल खेळणे आणि कोणत्याही कामात लक्ष न घालणे. मुलाच्या हाताच्या किंवा पायाच्या मासपेशी या कडक अथवा खेचलेल्या असणे. मूल व्यवस्थित बोलू न शकणे. मूल त्याचे डोळे एका ठिकाणी केंद्रीत न करू शकणे. 

सेरेब्रल पाल्सीचे निदानसीटी स्कॅन, एमआरआय, इईजी करून सेरेब्रल पाल्सीचे निदान केले जाते. आवश्यकता असल्यास काही रक्ताच्या चाचण्याही केल्या जातात. तसेच सेरेब्रल पाल्सीचा ईलाज कोणत्याही एका तज्ज्ञ डॉक्टराकडे जाऊन होत नाही तर यासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या समुहाकडे जावे लागते. यामध्ये नुरोलॉजीस्टकडून एमआरआय, सीटी स्कॅन तसेच ईईजी करून मुलांच्या हातापायातील ताठरपणा कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. गरज असलेल्या रुग्णांना बोटॅक्सची इंजेक्शन दिली जातात. यामुळे हातापार्यातील कडकपणा कमी होण्यास मदत होते.

अ‍ॅक्युपेशनल थेरेपिस्ट हे मुलांच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष देऊन त्यासाठी काम करतात. यासाठी न्युरो डेव्हलपमेंटल थेरेपी, सेंसरी इंटीग्रेशन थेरेपी याचा उपयोग करतात. हाता-पायातील कडकपणा व्यायामाने कमी करणे. मुलाला दैनंदिन जीवनात स्वावंलबी बनविणे. मासपेशीतील ताकद वाढविणे ही कामे करतात. फिजिओथेरेपीस्ट, स्पीच थेरेपिस्ट, सायकोलॉजिस्ट या विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडूनही या रुग्णांवर उपचार करून रुग्णाला बरे करण्याचे काम केले जाते. अशा प्रकारे सेरेब्रल पाल्सीमुळे अपंगत्व आलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. -डॉ. जगदीश राठोड(लेखक थेरेपिस्ट आहेत) 

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरHealthआरोग्यMedicalवैद्यकीय