शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

हिरे, रत्न अन् माणिकमोती खरेदीचा सोलापुरात वाढता ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 11:37 IST

सोलापुरात कोट्यवधीची होतेय उलाढाल; सोलापुरात शुद्धता तपासणीची सुविधा उपलब्ध

ठळक मुद्देचादर, टॉवेल उत्पादनासोबत गिरणगाव अशी ओळख असलेल्या शहराने कात टाकली कपडे, सोने, हिरे, मोती आणि रत्नांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे ब्रॅण्डेड शोरूम्स सोलापुरातमागील दीड-दोन वर्षांपासून हिरे,मोती आणि रत्नांची बाजारपेठ वधारली

यशवंत सादूल 

सोलापूर : चादर, टॉवेल उत्पादनासोबत गिरणगाव अशी ओळख असलेल्या शहराने कात टाकली आहे़ कपडे, सोने, हिरे, मोती आणि रत्नांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे ब्रॅण्डेड शोरूम्स सोलापुरात दाखल झाली आहेत. मागील दीड-दोन वर्षांपासून हिरे,मोती आणि रत्नांची बाजारपेठ वधारली असून, दिवसेंदिवस ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल यातून होत आहे. शहर व जिल्ह्याच्या दृष्टीने ही विकासात्मक बदलाची नांदी ठरत आहे़ भौतिक सुविधांसोबत आर्थिकदृष्ट्या स्मार्ट सोलापूरच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे यातून दिसून येते.

हिरे, मोती अन् रत्नांची मागणी पाहता शहरातील नामांकित सराफ पेढ्याही यांच्या विक्री क्षेत्रात आल्या़ पूर्वी त्यांची शुद्धता तपासणी होण्याची सुविधा सोलापुरात नसल्याने पुणे, मुंबईशिवाय पर्याय नव्हता़ ही उणीव भरून काढण्यासाठी अभिषेक रंपुरे व महेश धाराशिवकर यांनी सराफ बाजारात सिद्ध जेम्स लॅबची स्थापना केली. या लॅबच्या माध्यमातून मौल्यवान हिरे, रत्ने यांचे अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाने परीक्षण करून प्रमाणपत्र देण्यात येते. यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सराफ, ग्राहक आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूरसह कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा येथील व्यापारी व ग्राहकांचीही सोय झाली आहे़ यासाठी हिºयांच्या किमतीच्या मानाने नाममात्र फी घेतली जाते. पुणे, मुंबई येथून परीक्षण होऊन येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागायचे. त्यासाठी व्यवहार अडून राहायचा, या लॅबच्या माध्यमातून अवघ्या दीड-दोन तासात ही सेवा मिळते़

शिक्षण, नोकरीनिमित्त परदेशात आणि मुंबई, पुणे, बंगळुरू अशा भारतातल्या मोठ्या शहरात सोलापूरकरांची संख्या लक्षणीय आहे. तेथील नागरिकांकडून प्रतिष्ठा अन् पॅशन यासाठी वापरण्यात येणाºया हिरे, मोती, रत्ने यांचा प्रभाव यांच्यावर पडत आहे. साहजिकच त्याकडे आकर्षित होऊन पारंपरिक सोन्याचे दागिन्यांऐवजी हिरे, रत्नांचे दागिने वापरण्याकडे कल वाढत आहे. व्यापारी, राजकारणी, उद्योगपती हे प्रतिष्ठा अन् विविध संकटे, समस्यांपासून बचाव होऊन शांती, मानसिक समाधान मिळते, या हेतूने हिरे, रत्ने यांचे दागिने परिधान करत आहेत. ज्योतिष, पंचांग सांगणाºया गुरुजींकडून आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हिरे व रत्नांची शिफारस केली जाते़ हे भविष्य शास्त्रावर अवलंबून असून, राशी अन् जन्म नावाप्रमाणे रत्ने ठरलेली आहेत.

 तुलनेने अत्यंत महाग असलेल्या अलंकारांची मागणी मध्यम व उच्च उत्पन्न असणाºया ग्राहकांकडून मागील दीड-दोन वर्षांपासून वाढत आहे़ यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे़ दोन-तीन वर्षांपूर्वी अगदी बोटांवर मोजण्याइतके शहा ज्वेलर्स व विजय ज्वेलर्स ही दोनच दुकाने होती. सध्या शहरात आठ ते दहा हिरे, रत्नांचे व्यापारी असून, अनेक व्यापारी त्यांच्याकडून घेऊन ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करतात़

हिºयाची किंमत अशी ठरते...- हिºयाची किंमत त्याच्या कलर (रंग), कॅरेट (शुद्धता), क्लॅरिटी (पारदर्शकता) आणि कट्स (पैलूंची संरचना) या चार गुणधर्मावर ठरते़ त्याला फोर सी असे संबोधले जाते़ या चारही गुणधर्मामध्ये शुभ्र असलेला हिरा उच्च प्रतीचा मानला जातो, त्याची किंमत जास्त असते. सर्वसाधारणत: दोन हजारांपासून दोन लाख रुपये किमतीच्या हिºयांना सोलापुरात मागणी असून, त्याहून अधिक किमतीचेही हिरे बाजारात उपलब्ध आहेत, अशी माहिती रत्नपरीक्षक अभिषेक रंपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

रत्नपरीक्षक अभिषेक रंपुरे...- हिºयाची शुद्धता तपासणी करणारे अभिषेक यांनी केंद्र शासनाच्या इंडियन डायमंड इन्स्टिट्यूट सुरत येथून रत्नपरीक्षक ही पदवी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या जिमॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या मुंबईतील शाखेतील हिरे व रत्ने यांची शुद्धता तपासणीचा त्यांना दोन वर्षांचा अनुभव आहे़ त्यासोबत केरळमधीलही दोन वर्षांचा अनुभव असून, सोलापुरात सेवा देण्यासाठी ते रुजू झाले आहेत.

मागील दहा वर्षांपासून अग्नी आणि किस्ना या ब्रँडच्या हिरे व रत्नांची विक्री करत आहे़ पूर्व भागातील आर्थिक स्थिती चांगली असलेल्या ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला़ अलीकडच्या काळात प्रतिष्ठा राखण्यासाठी ग्राहकांची मागणी होत आहे़- सुरेश बिटला,हिरे-रत्ने व्यापारी, सोलापूर

युवतींना भुरळ...

- सोन्याच्या चेनमध्ये हिºयांचे पेंडॉल ठेवण्याची क्रेझ महिलांमध्ये वाढत आहे़ कर्णफुले,हिºयांची मोरणी, हिºयांच्या बांगड्या वापरण्याकडे मध्यमवर्गीय महिला आणि युवतींचा कल वाढत आहे़ यामुळे अग्नी, किस्ना, तनिष्क यांसारख्या आंतरराष्ट्रीय डायमंड कंपन्या सोलापुरात आहेत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरGoldसोनंMarketबाजार