शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Teachers day special; या गावाची ओळखच लय भारी; शिक्षकांनी घडविले शंभर अधिकारी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:46 IST

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला आहे.

सचिन कांबळे

पंढरपूर : आमच्या सापटणे गावची लोकसंख्या २५०० मात्र गावात १०० हून अधिक अधिकारी आहेत. हे सर्व सुभाष साळुंखे गुरुजींमुळे घडले, असे  गौरवोद्गार काढत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला आहे.

साळुंखे गुरुजींमुळे आयुष्याला आकारसापटणे-टेंभुर्णी (ता. माढा) येथील झेडपीच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. तेथे सुभाष साळुंखे गुरुजींचा सहवास लाभला.एकदा शाळेची सहल पंढरपूरला आली होती. तेथे कैकाडी महाराज मठात आमचे नाव पुकारावे म्हणून  खाऊला दिलेल्यापैकी १ रुपया देणगी दिली. त्यावर गुरुजी म्हणाले स्वकमाईने सामाजिक काम करावे. त्यांच्या विचारांमुळे आमच्या आयुष्याला आकार आला.

अन् जीवनाला कलाटणी मिळाली...इयत्ता दुसरीमध्ये गुरुजींनी १५ आॅगस्ट रोजी भाषण करण्यासाठी माझी  निवड केली. त्यांनीच भाषण लिहून दिले, हातवारे करून प्रभावी भाषण करायचे हे शिकवले. मात्र मला १५ आॅगस्टदिवशी दोन वाक्यानंतर बोलता येईना. ते पाहून मला त्यांनी एवढे बोलून मी भाषण संपवतो असे बोल म्हणून सांगितले. त्या वाक्यावर उपस्थितांनी खूप टाळ्या वाजवल्या. तेच भाषण          २६ जानेवारीला केले. तेव्हापासून मला वाचनाची खूप सवय लागली. यामुळे मी अधिकारी झालो.

नित्यनेमाने रोज दुपारी गावातून फेरफटकामी शिक्षण घेत असलेल्या शाळेची वेळ सकाळी ७ ते १०:३० नंतर दुपारी २ ते सायकांळी ५ वाजेपर्यंत अशी होती. काही मुले सुटीच्या वेळेत विटी-दांडू, क्रिकेट व अन्य खेळ खेळत असत. मात्र आमच्या साळुंखे गुरुजींना रोज दुपारी एक वाजता गावातून फेरफटका मारण्याची सवय होती. यामुळे शाळेतील अधिक विद्यार्थी दुपारच्या सुटीच्या वेळेत देखील . शाळेत, मंदिर, समाज मंदिरात अभ्यास करत असत. काही वेळेला रविवारच्या सुटीदिवशी देखील गुरुजी येतात की काय अन् रागावतील की काय, अशी सर्वांना भीती वाटायची. गुरुजींच्या फेरफटक्यामुळे अनेकांना रोज अभ्यास करायची सवय लागली. 

फुलांची माळ स्वत: गुंफलीतहसीलदार झाल्यानंतर मी गुरुजींची भेट घ्यायला गेलो होतो. तत्काळ त्यांनी विद्यार्र्थ्याला फुले आणायला पाठवले. त्यांनी स्वत: फुले गुंफून हार तयार केला. सर्व विद्यार्थ्यांसमोर माझा सत्कार केला. तुम्ही असेच मोठे व्हा, असे विद्यार्थ्यांना सांगितले. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरTeachers Dayशिक्षक दिनPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर