शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

वीज वितरणच्या विरोधात शेतकºयांचा आक्रोश, उपरी येथे रस्ता रोको,  थकीत वीज बिलासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 17:45 IST

उपरी (ता. पंढरपूर) व परिसरातील १० ते १२ रोहित्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने सोडविली असल्यामुळे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पंढरपूर-सातारा रस्त्यावरील उपरी येथे रस्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देजोपर्यंत खंडित वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत रस्ता रोको सुरू राहणार असल्याचा इशारायावेळी भंडीशेगावचे शाखा अभियंता सोनवणे  यांना निवेदन देण्यात आलेअधिकाºयांकडून केवळ वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले जात होते, परंतु जोपर्यंत वीजपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले

लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : वीज वितरण कंपनीने पंढरपूर तालुक्यात थकीत असलेल्या शेतकºयांचा वीजपुरवठा खंडित करून रोहित्र सोडविण्याचे काम सुरू केले आहे. उपरी (ता. पंढरपूर) व परिसरातील १० ते १२ रोहित्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने सोडविली असल्यामुळे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पंढरपूर-सातारा रस्त्यावरील उपरी येथे रस्ता रोको आंदोलन केले.जोपर्यंत खंडित वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत रस्ता रोको सुरू राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यामुळे पंढरपूर-सातारा रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुष्काळातील वीज बिले माफ करावीत, थकीत वीज बिले भरण्यासाठी चार ते पाच महिन्यांची मुदतवाढ मिळावी, रखडलेल्या सिंगल फेज योजना सुरू करून गाव डीपीचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवावा, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको केला.यावेळी कंपनीच्या अधिकाºयांकडून केवळ वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले जात होते, परंतु जोपर्यंत वीजपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे वरिष्ठांशी संपर्क साधून महावितरणच्या अधिकाºयांनी दोन दिवसात सर्व परिस्थिती सुरळीत करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.  यावेळी भंडीशेगावचे शाखा अभियंता सोनवणे  यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहकार शिरोमणीचे संचालक विलास जगदाळे, माजी उपसरपंच शहाजी मोहिते, शहाजी जगदाळे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ माने, सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नागणे, उपसरपंच आण्णा नागणे, पै. साहेबराव नागणे, दत्तात्रय मा. नागणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवनाथ आसबे, माजी अध्यक्ष तुकाराम नागणे, साहेबराव नागणे, चंद्रकांत बागल उपस्थित होते.-----------------ऐन हिवाळ्यात पिके धोक्यात-कंपनीच्या वतीने थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करून रोहित्र सोडविण्याचे काम सुरू असल्याने जनावरे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. नवीन लागवडीची पिके ऐन हिवाळ्यात धोक्यात आली आहेत. कोणताही अधिकार नसताना कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दंडेलशाही पद्धतीने रोहित्र सोडविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. ---------------आत्महत्येचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात आले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आमच्या जीवाशी खेळू नका, आमच्यावर दादागिरी करू नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील.- समाधान फाटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना----------------कष्टाचा दाम द्या-आम्ही नेमके कशा कशाकरिता रस्त्यावर उतरायचे हे कळेनासे झाले आहे. वीज बिलांबाबत लोकप्रतिनिधींना फोन लावला तर ते म्हणतात बिले भरा. ‘अच्छे दिन’ येतील म्हणून बदल केलेल्यांनीच सर्व पैसा काढून घेतला आहे. गोड बोले बाहुले गोड बोलून शेतकºयांसह सर्वांनाच वेठीस धरत आहेत. आम्हाला भीक नको, कष्टाचा दाम हवा आहे. आम्हाला लाईट द्या, दुष्काळाचे वीज बिल माफ करा अन्यथा आम्हाला ट्रकभर कासरे द्या, आम्ही हुतात्मे होण्यास तयार आहोत, असे शेतकरी दत्तात्रय नागणे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण