शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तुळशीच्या मोहरमने पिढ्यान् पिढ्या सांभाळलाय धार्मिक सलोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:02 IST

बाळासाहेब बोचरेसोलापूर :  मोहरम या सणाला धार्मिकतेची जोड असली तर माणसं एकत्र आली की धर्माच्या अभेद्य भिंतीही ढासळतात आणि माणसं कशी गुण्यागोविंदाने राहतात हे चित्र पाहायला मिळतंय माढा तालुक्यातल्या तुळशी गावात. इथला मोहरमचा सण हा हिंदू- मुस्लीम मिळून करतात. अख्खा गाव त्यासाठी आपले तन, मन आणि धन अर्पण करतो. नव्या ...

ठळक मुद्देदहा दिवस चालणाºया या उत्सवासाठी एक उत्सव कमिटीमाणसं एकत्र आली की धर्माच्या अभेद्य भिंतीही ढासळतात

बाळासाहेब बोचरेसोलापूर:  मोहरम या सणाला धार्मिकतेची जोड असली तर माणसं एकत्र आली की धर्माच्या अभेद्य भिंतीही ढासळतात आणि माणसं कशी गुण्यागोविंदाने राहतात हे चित्र पाहायला मिळतंय माढा तालुक्यातल्या तुळशी गावात. इथला मोहरमचा सण हा हिंदू-मुस्लीम मिळून करतात. अख्खा गाव त्यासाठी आपले तन, मन आणि धन अर्पण करतो. नव्या पिढीला आपल्या गावच्या या उत्सवाचं मोठं अप्रुप असून नोकरीधंद्यानिमित्त देशाटन केलेले तुळशीकर आपल्या गावचा हा अभिमान सांगितल्याशिवाय राहात नाहीत. गावचे राष्टÑपती पुरस्कारप्राप्त  शिक्षक जयराम दगडे गुरुजी यांनी त्यावर पुस्तकही लिहिलं आहे. 

दहा दिवस चालणाºया या उत्सवासाठी एक उत्सव कमिटी असते. मुस्लीम तिथीनुसार  यंदा १० सप्टेंबर रोजी कुदळ मारली असून ११ रोजी मोहरमचा पहिला दिवस मोजला जातो. मुस्लीम समाजाच्या वतीने वाजत गाजत येऊन पूजा करून कुदळ मारली जाते व खतम दिली जाते. यावेळी गावकरीही उपस्थित असतात. पाचव्या दिवशी दोन्ही सवाºयांची प्रतिष्ठापना केली जाते.  एक सवारी  कृष्णा मामा माळी यांची आणि दुसरी सवारी साहेबलाल भाई यांची. माळी यांचे वंशज शिवाजी देवकर तर साहेबलाल यांचे वंशज बशीरभाई मुलाणी हे सध्या सवारी घेतात. कृष्णा माळी यांची समाधी जेऊर येथे आहे. त्या ठिकाणी शिवाजी देवकरसह गावकरी सहा तारखेला जातात व खतम देतात. सातव्या दिवशी  कृष्णा मामाची सवारी उठवली जाते.

 सवारी घोटीच्या बंधूच्या भेटीसाठी जाते. आठव्या दिवशी गावकरी धुला खेळून वातावरण निर्मिती करतात. नवव्या दिवशी दोन्ही सवारी उठवल्या जातात. खेळवल्या जातात. त्यावेळी गावकरी सवारीसोबत  धुला खेळतात. शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. दहाव्या दिवशी  दिवसभर दोन्ही सवाºयांची नगरप्रदक्षिणा होते. नगारा ताशा, घंटा आदी वाद्यांसह गावकरी आनंदाने सवारीपुढे नाचतात. २० सप्टेंबर रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरMuslimमुस्लीमHinduहिंदू