शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अधिसूचनेत दुरुस्ती होऊनही बार्शी तालुका पोलीस ठाणे अद्याप कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 11:24 IST

राज्य शासनाच्या गृह खात्याने अधिसूचनेत दुरुस्ती केली. त्यानंतर जागांची पाहणी केली. तरीही बार्शी तालुका पोलीस ठाणे सुरू होण्यास दिरंगाई होत आहे.

ठळक मुद्दे जागांची पाहणी केली तरीही बार्शी तालुका पोलीस ठाणे सुरू होण्यास दिरंगाईराज्य शासनाच्या गृह खात्याने अधिसूचनेत दुरुस्ती केलीनव्याने होत असलेले पोलीस ठाणे हे कागदावरच राहिले

भ. के. गव्हाणे बार्शी दि ७ : राज्य शासनाच्या गृह खात्याने अधिसूचनेत दुरुस्ती केली. त्यानंतर जागांची पाहणी केली. तरीही बार्शी तालुका पोलीस ठाणे सुरू होण्यास दिरंगाई होत आहे. नव्याने होत असलेले पोलीस ठाणे हे कागदावरच राहिले आहे. पोलीस ठाणे केव्हा सुरू होणार? असा सवाल बार्शी शहर आणि तालुक्यामधील नागरिक करीत आहेत. ५९ गावांसाठी शहरात स्वतंत्र तालुका पोलीस स्टेशन सुरू करण्यासाठी ३० जून २०१७ मध्ये सुधारित अधिसूचना काढण्यात येऊनही ते अद्यापही सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. सुधारित अधिसूचना गृह विभागाने निघाल्यानंतर ती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांनी १३ सप्टेंबर २०१७ मध्ये बार्शीत येऊन विभागीय पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक संदीप मिटके, तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले, अधिकारी यांच्यासमवेत कासारवाडी रोडवरील हागरे प्लॉट, नगरपालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर व जुनी पोलीस चौकी या जागांची पाहणी केली होती. त्यास जवळजवळ तीन महिने होत आले तरी अद्याप जागा निश्चित करण्यात आली नाही.  पूर्वी मंजुरी मिळालेले तालुका पोलीस स्टेशन सुरू होण्याच्या अधिसूचनेतील ५९ गावांशिवाय कार्यरत असलेल्या शहर पोलीस ठाणे हद्दीतील तुळशीराम पोलीस चौकी, सुभाष नगर चौकी व शिवाजी नगर पोलीस चौकी या तिन्ही चौकींचा फेरबदल व दुरुस्तीचा प्रस्ताव गृह विभागाकडे सुधारित आदेशासाठी गेला होता. त्यास ३० जून २०१७ रोजी सुधारित अधिसूचना प्राप्त होऊनही आज तीन महिने झाले आहेत. ---------------------------तर लोकांची सोय होईल...च्सध्या आगळगाव व खांडवी या दूरक्षेत्रातील गावच्या लोकांना सोयीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेसाठी तसेच मोटर अपघातात तातडीने मदत मिळण्यासाठी विविध गुन्ह्यांबरोबरच राजकीय गुन्हेगारी यावर लक्ष ठेवण्यासाठी वैराग व पांगरी पोलीस स्टेशनला जावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या वेळेबरोबरच आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. शिवाय बार्शी-कुर्डूवाडी राज्यमहामार्ग आहे. या रस्त्यावरही दुर्घटना घडली तर तातडीने दखल घेण्यासाठी शिवाय जखमींना शहरातील दवाखान्यात दाखल करावे लागते. परंतु वैराग व पांगरी पोलीस स्टेशन लांब असल्याने पोलिसांची मदत मिळण्यास विलंब होतो. नवीन तालुका पोलीस स्टेशन सुरू झाल्यानंतर सोयीचे होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस