शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सोलापूर जिल्ह्यातील रिक्त ६६ गावांसाठी नव्याने पोलीस पाटील भरती, बार्शी व उत्तरची गावे, हंगामी नियुक्तीच्या २९ गावांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:45 IST

हंगामी व रिक्त असलेल्या ६६ गावांच्या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार असून, मागील महिन्यात काढलेल्या आरक्षण सोडतीनुसारच ही पदे भरली जातील, असे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.

ठळक मुद्देसोलापूर प्रांताधिकारी अंतर्गत बार्शी व उत्तर तालुक्यात १६६ पोलीस पाटील पदे आहेतआरक्षणानुसार पोलीस पाटील पदांची नियुक्ती केली जाते. आरक्षणासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला आहेएखाद्या गावात आरक्षणातील व्यक्ती नसेल तर तीन वेळा भरती प्रक्रिया राबवून आरक्षण बदलण्यात येईल : शिवाजी जगताप

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : हंगामी व रिक्त असलेल्या ६६ गावांच्या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार असून, मागील महिन्यात काढलेल्या आरक्षण सोडतीनुसारच ही पदे भरली जातील, असे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.सोलापूर प्रांताधिकारी अंतर्गत बार्शी व उत्तर तालुक्यात १६६ पोलीस पाटील पदे आहेत. यापैकी रिक्त असलेल्या ६६ गावांतील पोलीस पाटील पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर तालुक्यातील बीबीदारफळ, नरोटेवाडी, रानमसले, अकोलेकाटी, शिवणी, एकरुख तसेच मार्डी तर बार्शी तालुक्यातील रुई, सर्जापूर, सासुरे, बोरगाव(झा.), पिंपरी, झाडी, कांदलगाव, नारीवाडी, ढोराळे, हत्तीज, पिंपळगाव (ढा़), दहिटणे, दडशिंगे, इंदापूर, मळेगाव, रऊळगाव, घाणेगाव, तांबेवाडी, भातंबरे, कोरफळे, वाणेवाडी व यावली या गावांत हंगामी पोलीस पाटील पदे आहेत. मागील महिन्यात नव्याने काढलेल्या आरक्षणानुसार पोलीस पाटील पदाची भरती करण्यात आली होती, मात्र यामध्ये हंगामी पद असलेली गावे वगळली होती. आता नव्याने राबविल्या जाणाºया भरती प्रक्रियेत या गावांत पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरमध्ये राबविलेल्या भरतीवेळी रिक्त राहिलेल्या ३७ पैकी उत्तरच्या १० व बार्शीच्या २७ गावांत पोलीस पाटील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये हगलूर, तळेहिप्परगा, खेड, नंदूर, वडाळा, कळमण, मोहितेवाडी, पाथरी, हिरज, राळेरास(उत्तर तालुका) तसेच कारी, निंबळक, शेंद्री, पानगाव, शेलगाव(मा़), तडवळे, उंडेगाव, इर्ले, इर्लेवाडी, ढेंबरेवाडी, जहानपूर, सौंदरे, भोयरे, बळेवाडी, नागोबाचीवाडी, लक्ष्याचीवाडी, भोर्इंजे, बाभुळगाव, धामणगाव(आ़), पिंपळगाव(धस), हिंगणी(आऱ), मालेगाव, अंबाबाईचीवाडी, मिर्झनपूर, भांडेगाव, पिंपरी(आर) व महागाव या गावांचा समावेश आहे. 

----------------------काही गेले मॅटमध्ये गावडीदारफळ हंगामी पोलीस पाटील गावात राहत नाहीत, असे पत्र ग्रामपंचायत व मंडल अधिकाºयांनी दिल्याने तेथे भरती प्रक्रिया राबविली होती. परंतु हंगामी पोलीस पाटील अभिमन्यू वाघमारे यांनी आधारकार्ड अन्य कागदपत्रे, रहिवासी पुरावा देऊन मॅटमध्ये अपील केले आहे. याशिवाय अन्य काही गावांतील हंगामी पाटील मॅटमध्ये गेले आहेत. ----------------आरक्षणानुसार पोलीस पाटील पदांची नियुक्ती केली जाते. आरक्षणासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला आहे. सध्या एखाद्या गावात आरक्षणातील व्यक्ती नसेल तर तीन वेळा भरती प्रक्रिया राबवून आरक्षण बदलण्यात येईल. - शिवाजी जगतापप्रांताधिकारी सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस