शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

गुरुनानकांच्या विचारांचे स्मरण अन् जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 10:39 IST

प्रकाशपर्व;  गुरुनानक दरबार, गुरुद्वारामध्ये कीर्तन, प्रवचन; सिंधी वसाहत उजळून निघाली

ठळक मुद्देसिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघालागेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो

सोलापूर : शीख धर्मीयांचे पहिले धर्मगुरु गुरुनानक यांच्या विचारांचे स्मरण अन् त्यांच्या जयजयकाराने गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबार आणि अंत्रोळीकर नगरातील गुरुद्वारा लख-लख प्रकाशाने उजळून निघाला आहे. गुरुनानकांचा प्रकाशपर्व (जयंती) उद्या (मंगळवारी) साजरा होत असून, सिंधी समाज यानिमित्ताने एकवटला आहे. गुरुनानकांच्या प्रकाशपर्वानिमित्त दोन्ही ठिकाणी विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. 

‘वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतिह’, हा संदेश घेऊन गुरुद्वारामध्ये ३० आॅक्टोबरपासून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ७ ते रात्री ९  पर्यंत सत्संग सुरु आहे. उद्या (मंगळवारी) जयंतीचे औचित्य साधून सकाळी ६ ते ८ या वेळेत रागी भाई प्रितपाल सिंघजी यांचे कीर्तन तर रात्री १० ते १२ पर्यंत वीर मनिंदरपाल सिंघजी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत श्री गुरु ग्रंथ साहिब पाठची समाप्ती होणार असल्याचे गुरुद्वाराचे मुख्य सेवादार रमेशसिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गुरुद्वारामध्ये येणाºया भाविकांना लंगरची (महाप्रसाद) व्यवस्था करण्यात आली आहे.

गुरुद्वारामधील धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्रसिंग यांच्या नेतृत्वाखाली कपिल नानकानी, अमर सचदेव, मंगेश कटारिया, पवन लुल्ला, वासुदेव सचदेव, लवेज पहुजा, रोशन मुरजानी, रोहिन हेमनानी, विनोद नानकानी, प्रेम नानकानी, महेश भिकचंदानी, बलकारसिंग, बसंतसिंग बोमर आदी सिंधी बांधव परिश्रम घेत आहेत. 

गुरुनानक नगरातही गुरुनानकांचा प्रकाशपर्व- सिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघाला आहे. गेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो. गुरुनानक दरबारातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश धनवानी, सुनील कुकरेजा, गिरीश कुकरेजा, हरीश नानकानी, इंद्रलाल होतवानी, किशोर होतवानी, लक्ष्मण होतवानी, शंकर होतवानी, पूनम गुदलानी, विशनदास माखिजा, मनोहरलाल तलरेजा आदी परिश्रम घेत आहेत.

एखादा माणूस कुठल्याही जाती-धर्मातील असो, त्याला कुठलेही संकट आले तर तो गुरुनानक दरबारात येऊन गुरुनानकांसमोर नतमस्तक झाला तर त्याचे सर्वच दु:ख, संकट दूर होतात. गुरुनानकांना विष्णू-राम-कृष्णाचे अवतार मानले जाते. सर्वच जाती-धर्मांमध्ये एकता नांदो, हीच गुरुनानकांकडे प्रार्थना.-गागनदास कुकरेजा, सेवादारी- गुरुनानक दरबार.

टॅग्स :SolapurसोलापूरGuru Purnimaगुरु पौर्णिमा