शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

रोज चार हजार रुपयांवर तरुणीला वेश्या व्यवसाय करायला लावणारी रजिया आन्टी अखेर गजाआड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 11:45 IST

शास्त्रीनगर परिसरात कारवाई : भरवस्तीत चालायचा खुलेआम व्यापार; एकीस पोलीस कोठडी

ठळक मुद्देइंदिरानगर येथील कुंटणखान्यावर धाड टाकून पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात महिलेस दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे तर तरूणीस महिला सुधारगृहात ठेवण्यात आले

सोलापूर : शास्त्रीनगर परिसरातील भारतरत्न इंदिरानगर येथील कुंटणखान्यावर धाड टाकून पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले. कुंटणखाना चालवणाºया महिलेस दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे तर तरूणीस महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. रजिया जाबीर शेख (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. रजिया शेख ही शास्त्रीनगर भागातील भारतरत्न इंदिरानगर येथील एका घरात राहते. तिने वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुंबई येथील एका तरूणीस गेल्या सात वर्षांपूर्वी सोलापुरात बोलावून घेतले होते. या तरूणीस सोलापुरातील काही हॉटेल्समध्ये गिºहाईकांकडे पाठविले जात होते. काही ग्राहक घरी येत होते, अशा पद्धतीने वेश्या व्यवसाय चालू होता.

हा प्रकार आजूबाजूला राहणाºया लोकांच्या लक्षात आल्यानंतर चर्चा होऊ लागली. याची कुणकुण सदर बझार पोलिसांना लागली़ पोलीस निरीक्षक संजय पवार यांना कळाली. त्यांनी ही माहिती पोलीस नाईक अर्चना भाऊसाहेब गवळी यांना सांगून कारवाई करण्यास सांगितले. 

पोलीस नाईक अर्चना गवळी यांनी बोगस गिºहाईक तयार करून गुरूवारी सायंकाळी चार वाजता शास्त्रीनगर येथील भारतरत्न इंदिरानगर येथील रजीया शेख हिच्या घरी गेले. बोगस गिºहाईकाने रजीया शेख हिच्या घरात प्रवेश केला. तेथे २७ वर्षीय तरूणी वेश्या व्यवसाय करण्यासाठी बसली होती.

दरम्यान पोलिसांनी अचानक छापा टाकून तपासणी केली असता २७ वर्षीय तरूणी, घरकाम करणारी महिला व उसने पैसे परत मागण्यासाठी आलेली महिला अशा चौघीजणी आढळून आल्या. तरूणीस ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता तिला रजीया शेख हिने मुंबई येथून आणल्याचे सांगितले.

तिला वेश्या व्यवसायात दररोज ४ हजार ३00 रूपये देण्याचे ठरले होते, मात्र तिला काही पैसे दिले नसल्याचे तरूणीने सांगितले. घराची झडती घेतली असता साडेआठ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस