शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

रणजितदादांचे मोहोळमध्ये स्नेहभोजन, जुनी टीम उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:55 IST

माढ्याच्या विजयानंतर जिल्ह्यात राजकीय हालचाली सुरू

ठळक मुद्देरणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मोहोळ शहरांमध्ये भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यामुळे राजकीयदृष्ट्या ही भेट महत्त्वाची मानली जात आहेभाजपच्या या सुप्त संघटना बांधणीची सुरुवात मोहोळ शहरातूनच झाल्याची चर्चा शहर व तालुक्यात होत आहे

सोलापूर :  मोहोळ येथील मोहिते-पाटील समर्थक तथा जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे संचालक संतोष गायकवाड यांच्या निवासस्थानी रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी स्नेहभोजनासाठी आज आवर्जून हजेरी लावली. यावेळी मोहोळ शहर व तालुक्यातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी भाजपचे काही निवडक पदाधिकारी उपस्थित असले तरी भाजपमधील मोहोळ तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी मात्र याठिकाणी अनुपस्थित असल्याने  हे स्नेहभोजन भाजप समर्थकांसाठी होते की मोहिते-पाटील समर्थकांसाठी होते याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.

या स्नेहभोजनास  राष्ट्रवादीमधील काही दिग्गज नेते देखील उपस्थित होते. त्यामध्ये मोहोळचे माजी प्रथम नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारसकर यांचा समावेश आहे.  यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे अजयदादा कुर्डे, गणेश भोसले,रामदास झेंडगे इत्यादीसह भाजप आणि मोहिते- पाटील गटाचे समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते. 

संघटना बांधणी ?-  रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मोहोळ शहरांमध्ये भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यामुळे राजकीयदृष्ट्या ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दहा वर्षांपूर्वी मोहिते-पाटील गटाने मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यात देखील समर्थकांचे जाळे निर्माण करत विजय -प्रताप युवा मंचच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी संपर्क कायम ठेवला होता. भाजपच्या या सुप्त संघटना बांधणीची सुरुवात मोहोळ शहरातूनच झाल्याची चर्चा शहर व तालुक्यात होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९madha-pcमाढाVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील