शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

संकटाला चॅलेंज देणारी चपळगावातील रणरागिणी, पती अंथरुणाला खिळून: मुलेही अंध, दिव्यांग अन् कर्णबधिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 12:31 IST

मर्यादा ओलांडून संकटे घरी आली आणि वास्तव्य करून अख्ख्या कुटुंबाला छळण्यास सुरुवात केली. पतीचे पाय लुळे पडलेले आणि तीन मुलांपैकी एक मुलगा मुका तर दुसरा दिव्यांग. दोघेही कर्णबधिर. अशा स्थितीत संकटांसमोर शरण न जाता आल्या दिवसाला मोठे चॅलेंज देत चपळगावातील रणरागिणी भाजीपाला विकून फाटलेल्या संसाराला ठिगळ लावत आहे.

ठळक मुद्देही करुण आणि जिद्दीची कहाणी आहे चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील लिंबाबाई सिद्धप्पा रामपुरे या कर्तबगार महिलेचीसमाजात कित्येक महिलांना प्रतिकूलतेला सामोरे जावे लागते, हे खरे आअक्कलकोट येथे लिलावातून भाजी खरेदी करते अन् चपळगाव येथे सकाळ, संध्याकाळ विक्री व्यवसाय करते

शंभूलिंग अकतनाळआॅनलाइन लोकमत सोलापूरचपळगाव दि १ : मर्यादा ओलांडून संकटे घरी आली आणि वास्तव्य करून अख्ख्या कुटुंबाला छळण्यास सुरुवात केली. पतीचे पाय लुळे पडलेले आणि तीन मुलांपैकी एक मुलगा मुका तर दुसरा दिव्यांग. दोघेही कर्णबधिर. अशा स्थितीत संकटांसमोर शरण न जाता आल्या दिवसाला मोठे चॅलेंज देत चपळगावातील रणरागिणी भाजीपाला विकून फाटलेल्या संसाराला ठिगळ लावत आहे.ही करुण आणि जिद्दीची कहाणी आहे चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील लिंबाबाई सिद्धप्पा रामपुरे या कर्तबगार महिलेची. प्रतिकूलतेला टक्कर देत यशस्वी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र ती जणू जगाला देत आहे, अशा पद्धतीने तिचा संघर्ष सुरू आहे. पती सिद्धप्पा यांचे पंधरा वर्षांपूर्वी पाय लुळे पडल्याने ते घरीच बसून असतात. लिंबाबाईच्या तीन मुलांमध्ये अंबण्णा आणि काशिनाथ ही दोन मुले मुके आणि दिव्यांग असले तरी दोघेही कर्णबधिर आहेत. नशिबाने सोमनाथ नावाचा मुलगा सुदृढ जन्माला आला आहे. परंतु सोमनाथचे सध्या शिक्षण सुरू असून साहजिकच कुटुंबाची सारी जबाबदारी लिंबाबाईच्या गळ्यात पडली आहे. सुरुवातीला मिळेल ते काम करून संसार चालविणारी लिंबाबाई आज भाजीपाल्याचा व्यवसाय करते. ती रोज पहाटे अक्कलकोट येथे लिलावातून भाजी खरेदी करते अन् चपळगाव येथे सकाळ, संध्याकाळ विक्री व्यवसाय करते. यादरम्यान गावात फिरून सगळ्या लोकांशी स्नेह ठेवत ती व्यवसाय करते हे विशेष. मिळालेल्या उत्पन्नातून सोमनाथचे शिक्षण, घरातील पतीसह दिव्यांग मुलांचा दवाखान्याचा खर्च भागविते. घरातील सगळी कामे सांभाळून दिवसभर सात ते आठ तास पायी फिरून संसार चालविणाºया लिंबाबाईचा आदर्श समाजासाठी मार्गदर्शकच आहे.------------------------संकटांशी दोन हात करा- समाजात कित्येक महिलांना प्रतिकूलतेला सामोरे जावे लागते, हे खरे आहे. माझ्यावर देखील संकट निर्माण झाले तरी मी न डगमगता कष्ट करून संसार चालवित आहे. नारी ही अबला नसून सबला आहे. यातूनच संसार फुलतो. यासाठी संकट निवारणासाठी महिलांनी पुढाकार घेत दोन हात करावे. यातून आपोआप मार्ग सापडत जातो, अशा भावना लिंबाबाई रामपुरे यांनी व्यक्त केल्या.----------------------तीच आमची देवता: पती- माझी दोन मुले विकलांग असून मीसुद्धा १५ वर्षांपासून पाय लुळे पडल्याने घरीच बसून असतो. माझ्या पत्नीने आम्हाला वाºयावर न सोडता आमचा सांभाळ बिनबोभाट करताना कधीही आमचे मन दुखावले नाही. आमच्यासाठी ती पायपीट करताना डोळे पाणावतात. पण आम्ही काही करू शकत नसल्याचे दु:ख मनाशी सलते. पण सारासार विचार केल्यास लिंबाबाईने आमच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचत जग बदलले. ती आमच्यासाठी देवताच बनून आली असल्याच्या भावना पती सिद्धप्पा रामपुरे यांनी व्यक्त केल्या.शासकीय मदत मिळावी- आमच्या येथील लिंबाबाई रामपुरे या महिलेची कहाणी दुर्दैवी आहे. या कुटुंबाला आजतागायत कोणत्याही प्रकारची शासकीय सवलत अथवा मदत न मिळणे ही शोकांतिका आहे. शासनाचे हे अपयश असून उपेक्षित लिंबाबाईच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी ही अपेक्षा आहे, अशी भावना अंबण्णा भंगे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Solapurसोलापूर