शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिका हद्दीतील रमाई घरकुलास ५० हजार वाढीव मिळणार, शासनाच्या आदेशाचा ७७० लाभार्थ्यांना होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 13:00 IST

राज्य शासनाने रमाई आवास योजनेसाठी अनुदानाची रक्कम ५0 हजाराने वाढविली असून, मनपातर्फे राबविण्यात येणाºया रमाई आवास घरकूल योजनेतील ७७0 पात्र लाभार्थ्यांना याचा फायदा देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे घरकूल योजनेतील ७७0 पात्र लाभार्थ्यांना याचा फायदा देण्यात येणारआणखी ८०१ लाभार्थी प्रतीक्षेत... मनपा क्षेत्रातील पहिला हप्ता दिला गेलेल्या ७७० पात्र लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान वितरित करण्याचे आदेश सोलापूरसाठी सद्यस्थितीत १४८६ घरकुले मंजूर आहेत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : राज्य शासनाने रमाई आवास योजनेसाठी अनुदानाची रक्कम ५0 हजाराने वाढविली असून, मनपातर्फे राबविण्यात येणाºया रमाई आवास घरकूल योजनेतील ७७0 पात्र लाभार्थ्यांना याचा फायदा देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. समाजकल्याण विभाग व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने शासन पुरस्कृत रमाई आवास योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविली जात आहे. सोलापूरसाठी सद्यस्थितीत १४८६ घरकुले मंजूर आहेत. यापैकी ६८१ घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित घरकुलाचे काम प्रगतिपथावर आहे. ७ जानेवारी २०१७ रोजी राज्य शासनाने रमाई आवास योजनेसाठी शहरी भागातील वैयक्तिक लाभार्थ्यांकरिता प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली आहे. या योजनेत ३० चौ. मी. घरकूल बांधकामासाठी लाभाची रक्कम व पात्रतेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी या योजनेसाठी दोन लाख अनुदान दिले जात होते. त्यानंतर ते अडीच लाखांवर नेले. पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे वाढीव अनुदानासाठी विविध स्तरातून पाठपुरावा सुरू होता. याबाबत ३0 नोव्हेंबर रोजी घरकूल समितीने वाढीव अनुदान अदा करण्याबाबत पत्र दिले होते. याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. यामध्ये वाढीव अनुदान सन २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून लागू राहील. मनपा क्षेत्रातील पहिला हप्ता दिला गेलेल्या ७७० पात्र लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. ---------------आणखी ८०१ लाभार्थी प्रतीक्षेत...- मनपा क्षेत्रातील रमाई घरकूल निर्माण समितीची बैठक सप्टेंबरमध्ये आयुक्त कार्यालयात झाली. दारिद्र्यरेषेखालील ८0१ लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी नगर अभियंता कार्यालयाने बीपीएल क्रमांक व त्यांच्याकडील उपलब्ध जागेचा अभिप्राय घ्यावा व नंतर प्रकरणास मंजुरी द्यावी, असे यावेळी चर्चेअंती ठरले. ही योजना यशस्वी होण्यासाठी मनपाने खासगी झोपड्या अधिग्रहीत कराव्यात व वाढीव अनुदान मिळावे, अशी मागणी आनंद चंदनशिवे यांनी केली होती. या पाठपुराव्यानंतर शासनाकडून आलेल्या पत्रावर आयुक्तांनी तातडीने निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका