शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

रजनीकांतचा लाभ काँग्रेसला अधिक होईल, सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापूरात वक्तव्य, बुधवारी दिल्लीत महत्वाची बैठक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 3:41 PM

     रजनीकांत यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा या घोषणेशी निकटचा संबंध असून त्यांच्या सल्ल्यानेच रजनीकांत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही राजकीय वतुर्ळात सुरू झाली

ठळक मुद्दे  रजनीकांत यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा या घोषणेशी निकटचा संबंधरजनीकांतच्या राजकारण प्रवेशामागे कोणीही असले तरी त्याचा फायदा प्राप्त परिस्थितीत काँग्रेसला अधिक होईल़ रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेला अर्थ होता़ अखेर रजनीकांत यांनी वर्षा अखेरचा मुहूर्त काढला आणि राजकारण प्रवेशाचा बार उडवून दिला

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि १  : तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपट अभिनेता रजनीकांत यांनी प्रवेश केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ काँग्रेस पक्षाला होईल असे वक्तव्य पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले.       तमिळ चित्रपट अभिनेता रजनीकांत यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका रविवारी जाहीर केली. गेली अनेक वर्षे त्यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा होती ,परंतु दस्तुरखुद्द रजनीकांत याविषयी फारसे बोलत नव्हते, योग्य वेळी ते आपली भूमिका जाहीर करतील अशी अटकळ राजकीय क्षेत्रात बांधली जात होती. तामिळनाडूच्या राजकीय क्षेत्रात जयललिता यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली, त्यामुळे रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेला अर्थ होता़ अखेर रजनीकांत यांनी वर्षा अखेरचा मुहूर्त काढला आणि राजकारण प्रवेशाचा बार उडवून दिला.       रजनीकांत यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा या घोषणेशी निकटचा संबंध असून त्यांच्या सल्ल्यानेच रजनीकांत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही राजकीय वतुर्ळात सुरू झाली, याकडे सुशीलकुमार शिंदे यांचे लक्ष्य वेधले असता ते म्हणाले, रजनीकांतच्या राजकारण प्रवेशामागे कोणीही असले तरी त्याचा फायदा प्राप्त परिस्थितीत काँग्रेसला अधिक होईल़ मात्र याबद्दल खुलासा करण्याचे त्यांनी टाळले.       सध्या शिंदे सोलापूर दौºयावर आहेत. आठ दिवसाचा त्यांचा नियोजित दौरा होता, मात्र बुधवारी सायंकाळी दिल्लीत पक्ष्याध्यक्ष राहुल गांधी यांनी तातडीची बैठक बोलावली असल्याने दौरा आटोपता घेत बुधवारी सकाळी ते दिल्लीला जाणार आहेत़ तामिळनाडूच्या राजकीय घडामोडीवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

टॅग्स :rajinikanthरजनीकांतSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSolapurसोलापूर