शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रागीट बलराम, राजूचा संयमीपणा, लडीवाळ हिना अन् जिमीचा अल्लडपणा सोलापूरकरांना भावतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 14:59 IST

सोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय: बिबट्यांशी जोडली नाळ ; काळजीवाहक कर्मचाºयांना लागला लळा

यशवंत सादूल 

सोलापूर : मागील चार वर्षांपासून महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात वास्तव्यास असलेल्या बिबट्यांचे आता सोलापूरकरांशी घट्ट नाते झाले असून, आजवर चार लाख दर्शकांनी या बिबट्यांना पाहण्यासाठी प्राणीसंग्रहालयास आवर्जुन भेट दिली आहे.  येथील काळजीवाहक सेवकांनी त्यांच्या स्वभावाचे बारकाईने निरीक्षण करीत त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. त्यामुळे ते पूर्णत: माणसाळले आहेत़; पण या बिबट्यांची स्वभाव मात्र वेगवेगळे आहेत. बलराम हा रागीट आहे, राजू संयमी; तर जिमी अल्लड आहे. सोलापूकरांना त्यांच्या याच वैशिष्टयांमुळे ते भावत आहेत.

सकाळी अकराची वेळ ....बिबट्याचा पिंजरा उघडला जातो अन् फाटकाचा आवाज येताक्षणी बलराम डरकाळी फोडत नाराजी व्यक्त करतो़ कारण होते काळजीवाहक भारत शिंदे यांची दोन - तीन दिवसांपासून न झालेली भेट. त्याला जवळ बोलवून त्याच्या अंगावरून हात फिरवून शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे गुरगुरणे सुरूच़ बलराम हा नरबिबट्या चार वर्षांपूर्वी सोलापुरात आणला तेव्हा चारही बिबट्यांमध्ये सर्वात मोठा होता . साडेसात वर्षांचा असलेल्या बलरामचा आक्रमकपणा लहानपणापासून आजही तसाच आहे़ दुसºया पिंजºयातील राजू हा मात्र संयमी असून, प्रसंगी क्वचितच आक्रमक होतो. राजू ...राजू ....हाक मारताच हा सेवकांच्या जवळ येतो़ पाठीवरून हात फिरवताच शांत होतो पण लवकर भोजन दिले नाही तर मात्र गुरगुरतो. सोलापुरात आला तेव्हा अडीच वर्षांचा असलेला हा नरबिबट्या आज सहा वर्षांचा झाला आहे. तिसºया पिंजºयासमोरून हिना़.. हिना़.. अशी हाक मारताच धावतच पिंजºयांसमोर बसलेल्या सेवकांच्या हातांना अंग घासत इकडून तिकडे येरझाºया घालत राहते़ जवळपास दहा ते पंधरा मिनिटे त्याचा खेळ चालतो़ त्यानंतर एकेक सेवक त्याच्या पाठीवरून हात फिरवितात़ शांतपणे उभा राहून, त्यांचे हात चाटून प्रतिसाद देतो. अडीच वर्षांची असलेली हिना आज साडेसहा वर्षांची झाली आहे.

जिमी तर सगळ्यांमध्ये लहान असून, तिच्या बाळलीला सर्वांना आकर्षित करून घेतात़ जिमी ...जिमी .... अशी सेवकांकडून हाक मारताच धावतच येणारी सर्वात लहान सहा वर्षांची असलेली जिमी अत्यंत लाडकी आहे. सेवक पिंजºयासमोर बसले की तीही बसते आणि ते उभे राहिले की उभा राहून पंजाने त्यांना स्पर्श करण्यासाठी धडपडत असते़ सेवकांनी हालचाली केल्याप्रमाणे ती उड्या मारते़ पाठीवरून हात फिरविले की दाद देते़ पिंजºयातील ओंडक्यावर पळत जाऊन बसते .मध्येच त्यावरून उडी मारत भिंतीमागून लपूनछपून पाहते अन् पळत येते़ जायला निघाले की पंजाने थांबविण्याचा प्रयत्न करते. सेवक समोरून निघून जाताना पाहून आतल्या रूममध्ये रुसून बसते. बलराम, आक्रमक ,राजू कधी शांत, संयमी तर कधी रागाला येणारे आहेत़ हिना अन् जिमी या मादीला शोभेल असेच असून, कायम शांतपणे फिरत असतात़ येणाºया प्रेक्षकांना आपल्या बाळलीलांनी करमणूक करतात़ येथील सेवकांसमोर तर कमालीची मस्ती करतात़ या पूर्णपणे माणसाळलेल्या अल्लड स्वभावाच्या या बिबट्यांचा इथल्या सेवकांना लळा लागलेला आहे़

अन् डोळ्यांत अश्रू आले...- सुरुवातीपासून बिबट्यांचे काळजीवाहू सेवक असलेले भरत शिंदे एका रविवारी आपल्या कुटुंबीयांना घेऊन प्रेक्षकांसोबत उभे होते .त्यांचे दर्शन काही होईना .त्यांनी लांबूनच जिमी, हिना़़ हिना़़ अशी हाक मारताच प्रेक्षकांच्या दिशेने पळत आले .पिंजºयांत उभे राहून आवाजाच्या दिशेने एकटक पाहू लागले .त्याक्षणी डोळ्यात टचकन् पाणी आले अशी हृदयस्पर्शी आठवण काळजीवाहक भरत शिंदे यांनी सांगितली.

चिकन, मांस अन् त्वचेच्या चकाकीसाठी अंडी - बिबट्यांना दररोजच्या आहारात मांस अन् चिकन दिले जाते़ त्यांच्या शरीरावरील त्वचेला चकाकी येण्यासाठी अधूनमधून अंडी दिली जातात़ दिवसातून एकदाच सकाळी हे अन्न दिले जाते. पचनसंस्थेस आराम मिळावा व त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी झू अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाच्या नवीन नियमानुसार आठवड्यातून एकदा दर शुक्रवारी त्यांना विनाभोजन ठेवले जाते.

बिबट्या सोलापूरला मिळालेले वरदान असून, शहराच्या अडीचशे किलोमीटर परिसरात बिबट्या पाहावयास मिळत नाही़ सोलापूरच्या नागरिकांचे सुदैव असे की येथील संग्रहालयातील प्राणी अगदी जवळून पाहावयास मिळतात़ त्याचे योग्य जतन करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे़ - डॉ. नितीन गोटे, संचालक, महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय़

टॅग्स :SolapurसोलापूरTigerवाघAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार