शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सोशल मीडियावर बेडशीट गॅंगच्या नावाने खोटे संदेश 'व्हायरल' करणारे पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 11:24 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

बेडशीट व इतर वस्तू विकणाऱ्या पासून सावध रहा हे दरोडेखोर आहेत हे सर्व गावातील ग्रुपवर पाठवा असा मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या नावाने खोटा व बनावट संदेश तयार करून ते सोशल मीडियावर 'व्हायरल' केला जात आहे याप्रकरणी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी  चौकशी सुरू केली आहे. कोणतीही पोस्ट खातरजमा जमा न करता नागरिकांत भीती निर्माण होईल असे खोटे मेसेज व्हाट्सआप वर पसरवणाऱ्या व्यक्तींचा सायबर गुन्हे शाखेमार्फत शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दिला आहे.   याबाबत अधिक माहिती अशी, गेले काही दिवस सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्‌स अपवर  सौजन्य मंगळवेढा पोलीस स्टेशन यांच्या नावाने बोगस संदेश फिरत आहेत. चुकीची माहिती देणारे हे आवाहन करणारे संदेश व्हायरल होत आहेत. बेडशीटसह वस्तू विकणारे दरोडेखोर आहेत अशा चुकीच्या मेसेजमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे.   याबाबत पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता  त्यांनी हा मेसेज चुकीचा आहे.अशा प्रकारचे कोणतेही आवाहन मंगळवेढा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याची माहिती 'लोकमत' शी बोलताना दिली.त्यामुळे नागरिकांनी असे बेडशीट विकणाऱ्याबद्दल मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या नावाने असणारे संदेश, आवाहन कोणतीही खात्री न करता पुढे पाठवू नयेत. माहितीची सत्यता पडताळावी याबाबत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. व्हाट्सआप अडमिन नी असे मेसेज पाठवणाऱ्याला समज द्यावी अशा खोट्या अफवा पसरणे, खोटी माहिती पसरवणे हा गुन्हा असून मंगळवेढा पोलीस व  सायबर क्राईम पोलीस अशा घटनांवर लक्ष ठेवून आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

अफवेने घेतला होता पाच जणांचा जीवखवे येथील नाथपंथी (डवरी) समाजाचे लोक धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षा मागावयास गेल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाच लोकांना ग्रामपंचायतमध्ये कोंडुन बेदम मारहाण केली होती. यामध्ये या पाच लोकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती अशाप्रकारे अशा खोट्या मेसेज निष्पाप लोकांचा हकनाक जीव जाऊ शकतो याचे भान ठेवले पाहिजे. यासाठी गावोगावच्या पोलिस पाटील यांनी मुसाफिरी रजिस्टर मध्ये अनोळखी विक्रेत्यांची मोबाईल नंबर, आधार कार्ड अशी माहिती अद्ययावत ठेवावी. सोने पॉलिश करून देणारे अथवा चेकिंग चालू आहे पोलीस असल्याचे सांगून सोने लाबवणाऱ्यापासून सावध रहा पोलीस अशा प्रकारे कोणालाही सोने देण्याबाबत सांगत नाहीत तरी नागरिकांनी एकाद्या अनोळखी व्यक्ती बदल संशय आल्यास थेट मंगळवेढा पोलिस ठाण्यात संपर्क करावा. पोलीस सर्वोतोपरी तुमच्या मदतीला तयार असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSocial Mediaसोशल मीडियाSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस