शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

अफवांच्या बाजाराला आवर घाला, यदू जोशी  यांचे आवाहन, लोकमतचे रवींद्र देशमुख यांचा ‘ल़ गो़ काकडे स्मृती पुरस्कार’ने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 17:30 IST

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने लोकमतचे उपमुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना यंदाचा ‘कल्पतरुकार कै़ ल़ गोक़ाकडे स्मृती पुरस्कार’ जोशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देसोशल मीडियाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे़ जेव्हा एखाद्या व्यक्तीवर टीका करायची आहे तेव्हा त्याच्या चुका शोधून त्यावर भाष्य करणे क्रमप्राप्त आहे़ : यदू जोशी पत्रकारांना वैविध्यपूर्ण ज्ञान मिळविण्याची भूक असावी़ सत्यतेवर आधारित लिखाणाचे कौशल्य आत्मसात करावे़ व्यक्ती अथवा व्यक्तिद्वेषावर टीका करु नये : यदू जोशी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : समाजात अविचारांचा उच्छाद मांडणाºयांना थोपविणे, चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणे, वाचकांना आवडेल अशा विषयावर लिखाण करणे, सध्याच्या अफवांच्या बाजाराला आवर घालणे, अशी अनेक आव्हाने पत्रकारांसमोर असल्याचे प्रतिपादन राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी केले़देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने लोकमतचे उपमुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना यंदाचा ‘कल्पतरुकार कै़ ल़ गोक़ाकडे स्मृती पुरस्कार’ जोशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते़ हि़ ने़ वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे होते़ व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा़ डॉ़ श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर, शंकर कुलकर्णी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, प्रमुख कार्यवाह श्याम जोशी, महिला शाखेच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ परिचय दत्तात्रय आराध्ये यांनी करुन दिला़ प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा़ डॉ़ श्रीकांत येळेगावकर यांनी केले़ जोशी पुढे म्हणाले, सोशल मीडियाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे़ जेव्हा एखाद्या व्यक्तीवर टीका करायची आहे तेव्हा त्याच्या चुका शोधून त्यावर भाष्य करणे क्रमप्राप्त आहे़ चुकांवर पांघरुन घालणारे नसावे़ पूर्वी एखादी घटना घडली की सायंकाळी बातमी टाईप करुन पानावर सोडली जायची़ आता मल्टिमीडियाचा जमाना असून, घटना घडली की अगोदर त्या जागेवर जाऊन माहिती आॅनलाईन सोडावी लागते़ हे बदल पत्रकारांना स्वीकारावेच लागतील़ पत्रकारांना वैविध्यपूर्ण ज्ञान मिळविण्याची भूक असावी़ सत्यतेवर आधारित लिखाणाचे कौशल्य आत्मसात करावे़ व्यक्ती अथवा व्यक्तिद्वेषावर टीका करु नये, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले़ सूत्रसंचालन श्याम जोशी यांनी केले़ आभार गिरीश यांनी मानले़ यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, पंचांगकर्ते मोहन दाते, माजी नगरसेविका मोहिनी पत्की, कवी माधव पवार, सुविद्या प्रकाशनचे बाबुराव मैंदर्गीकर, पाखर संकुलच्या शुभांगी बुवा आदी उपस्थित होते़------------------पुरस्काराची रक्कम पाखर संकुलास... - देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने पुरस्काराच्या रुपाने दिलेली पाच हजारांची रक्कम रवींद्र देशमुख यांनी पाखर संकुलास दिली़ पाखर संकुलाच्या शुभांगी बुवा यांनी ही रक्कम स्वीकारली़ 

टॅग्स :Solapurसोलापूरreporterवार्ताहर