शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दोड्डी तांड्यातून 'पुष्पा' ला अटक; ५ हजार लिटर हातभट्टी दारु जप्त; सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By appasaheb.patil | Updated: September 3, 2022 09:45 IST

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवार २ सप्टेंबर रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यात एका घरात टाकलेल्या छाप्यात एका मोटरसायकलीसह ५ हजार १६५ लिटर हातभट्टी दारू व १ टन ११० किलो गुळ पावडर जप्त करून गुन्ह्यात ३ लाख ५९ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षक अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने शुक्रवार २ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यातील भिमराव काशिनाथ राठोड (वय ४२ वर्षे, रा. दोड्डी तांडा, ता. दक्षिण सोलापुर) याच्या राहत्या घरी धाड टाकली असता त्याच्या घरात व घरासमोरील २ पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारु व गुळ पावडर साठवून ठेवल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी  झडती घेतली असता २०० लिटर क्षमतेच्या ४ प्लास्टिक बॅरलमध्ये ८०० लिटर हातभट्टी दारू, ५० लिटर क्षमतेच्या ६८ प्लास्टीक कॅनमध्ये 3400 लिटर हातभट्टी दारु, ८० लिटर क्षमतेच्या १२ रबरी ट्यूबमध्ये ९६० लिटर हातभट्टी दारु, १ लिटर क्षमतेच्या ५ प्लास्टीक बाटल्यांमध्ये ५ लिटर हातभट्टी दारु असा एकूण ५१६५ लिटर हातभट्टी दारुचा साठा जप्त केला, तसेच हातभट्टी दारु तयार करण्याकरिता वापरण्यात येणा-या गुळ पावडरच्या ३० किलो क्षमतेच्या ३७ गोण्यातून १ टन ११० किलो  गुळ पावडर जप्त करण्यात आले. तसेच सदर ठिकाणावरुन 4 रिकामे  प्लास्टिक बॅरल, २० रिकाम्या रबरी ट्यूबा, १ वापरता मोबाईल, एक प्लास्टीक नरसाळे, १ मोटरसायकल असा एकूण ३ लाख ५९ हजार ४५०  रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, आरोपी  भिमराव काशिनाथ राठोड यास जागीच अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सदानंद मस्करे करीत आहेत. सदर कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त पुणे विभाग अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांचे नेतृत्वात उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक अ विभाग संभाजी फडतरे, निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, अंकुश आवताडे, सुरेश झगडे, सुनिल पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, बिराजदार, मुकेश चव्हाण, जवान ईस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, प्रकाश सावंत, प्रियंका कुटे, शोएब बेगमपुरे, वाहनचालक संजय नवले व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग