शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचे शुध्दीकरण सुरू झाले : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 11:28 IST

सोलापूर : मी मुसलमान. माझा आजा शेतकरी, माझा बाप शेतकरी. मीपण शेतकºयांसाठी काम करतोय. ढेकूळ कुट्ट्यांनो, मतदान जातीवर नाही, तर धोरणावर करायचे असते. तुम्हीही बाजार समितीच्या निवडणुकीत जातपात न बघता मतदान करा, असे आवाहन कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील श्री सिध्दरामेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ ...

ठळक मुद्दे देशात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्र्याने चमत्कार केला - पाशा पटेलमार्केट कमिटीमध्ये बोक्यांचं मतदान बंद झालंय - पाशा पटेल

सोलापूर : मी मुसलमान. माझा आजा शेतकरी, माझा बाप शेतकरी. मीपण शेतकºयांसाठी काम करतोय. ढेकूळ कुट्ट्यांनो, मतदान जातीवर नाही, तर धोरणावर करायचे असते. तुम्हीही बाजार समितीच्या निवडणुकीत जातपात न बघता मतदान करा, असे आवाहन कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील श्री सिध्दरामेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पाशा पटेल यांनी आपल्या खुमासदार शैैलीत बाजार समिती निवडणूक आणि पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून शेतकºयांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. पाशा पटेल म्हणाले, पूर्वी सोसायटीच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार होता.

आता तुमचं प्रमोशन झालंय. सुभाषबापूंनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. देशात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्र्याने चमत्कार केला. या मार्केट कमिटीमध्ये बोक्यांचं मतदान बंद झालंय. आता जो घाम गाळतोय, ज्याचा माल विकतोय, त्या विकणाºयाला पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालाय. लोकशाहीचे शुध्दीकरण सुरु झाले आहे. आता बोके गरिबांची जिरवतेत की गरीब बोक्यांची जिरवतेत हे या निवडणुकीतून लक्षात येणार आहे. आता बापूंनी सरळ रेघ आखून टाकली आहे. या रेघवर आता मतदान आहे. या माणसाने भल्याभल्याची जिरवली आहे. आता तुम्ही ठरवायचे आहे की तुम्ही माणसाला विजयी करायचं, की दुसºयाला. 

टॅग्स :SolapurसोलापूरPasha Patelपाशा पटेलAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक