शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी सोलापूरकर ; करमाळ्याच्या माजी नगराध्यक्षा पुण्यात बनल्या भाजीपाला विक्रेत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:49 IST

नासीर कबीर करमाळा : २० वर्षांपूर्वी आरक्षणाचा फायदा झाला अन् सुशीला रामा आगलावे या करमाळ्याच्या नगराध्यक्षा बनल्या. १९९७-९८ या वर्षात भरीव काम केल्यावर त्या पायउतार झाल्या अन् कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या पुण्यातील तुळजाई झोपडपट्टीत स्थायिक झाल्या. पुणेरी सोलापूरकर बनलेल्या सुशीला आज भाजीपाला विक्रेत्या बनल्या असून, याच व्यवसायाच्या बळावर त्या संसाराचा गाडा हाकत ...

ठळक मुद्देकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या पुण्यातील तुळजाई झोपडपट्टीत स्थायिक झाल्यापुणेरी सोलापूरकर बनलेल्या सुशीला आज भाजीपाला विक्रेत्या बनल्यावसायाच्या बळावर त्या संसाराचा गाडा हाकत आहेत

नासीर कबीर करमाळा : २० वर्षांपूर्वी आरक्षणाचा फायदा झाला अन् सुशीला रामा आगलावे या करमाळ्याच्या नगराध्यक्षा बनल्या. १९९७-९८ या वर्षात भरीव काम केल्यावर त्या पायउतार झाल्या अन् कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या पुण्यातील तुळजाई झोपडपट्टीत स्थायिक झाल्या. पुणेरीसोलापूरकर बनलेल्या सुशीला आज भाजीपाला विक्रेत्या बनल्या असून, याच व्यवसायाच्या बळावर त्या संसाराचा गाडा हाकत आहेत. 

करमाळ्यात असताना घरची परिस्थिती हलाखीची होती. पती करमाळा बसस्थानकावर हमालीचे काम करायचे. शहरातील अण्णाभाऊ साठे नगरात एका पत्र्याच्या घरात पती, पाच मुलांसह त्या राहत होत्या. एक मुलगा लाला पायाने अपंग आहे. अशिक्षित असलेल्या सुशीलाबाई यांना त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून महिन्याला अवघे ३० रुपये भत्ता मिळत असे. कित्येक वेळा उपाशी राहून त्या नगरपरिषदेच्या सभा, कार्यक्रमांना हजेरी लावत असे. 

कितीही वाईट वेळ आली तरी त्यांनी कोणापुढे कधीच हात पसरले नाहीत. नगराध्यक्षपदाची धुरा वाहत असतानाही त्यांनी कुटुंबाच्या पालनपोषणासाठी केळी विकण्याचा व्यवसाय कधीच सोडला नाही. नगराध्यक्ष असताना त्यांनी  अपंग मुलास नगरपालिकेत एखादी नोकरी मिळवली असती, पण ते साधे कामही त्या करु शकल्या  नाहीत. यावरुन त्यांच्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. 

सुशीलाबाई आगलावे यांच्या पतीचे निधन झाले. डोळ्यासमोर अंधारी उभी राहिली. आता काय करायचे ? संसाराचा गाडा कसा हाकायचा ? या विचाराने त्या पुण्यातील तुळजाई झोपडपट्टीत स्थिरावल्या. दहा बाय बाराच्या एका झोपडीत राहून घरातील  नऊ सदस्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सुशीलाबार्इंनी वयाची साठी ओलांडल्यानंतरही डोक्यावर पाटी घेऊन त्या गल्लीबोळातून भाजीपाला विकत आहेत. त्यांचा एक मुलगा हमालीचे काम करतो तर दुसरा अपंग बेरोजगार आहे. 

नशिबी घरकूलसुद्धा नाही..- एकेकाळी करमाळ्याच्या प्रथम नागरिक असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सुशीलाबाई यांना करमाळा शहरात घरकुलसुध्दा मिळालेले नाही.त्यांना वाटते करमाळ्यात आपले हक्क ाचे चांगले घर असावे, त्यांनी करमाळा नगरपरिषदेत घरकुल अनुदानासाठी प्रस्ताव दिलेला आहे, पण त्यांना अनुदान मिळालेले नाही़ त्या अधूनमधून पुण्याहून आशेने येतात, चौकशी करतात व निराश होऊन परत जातात.

पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे गाठले...- करमाळा नगरपरिषदेत अपंग उमेदवारांची नोकर भरती होती. त्यावेळी माझ्या मुलास कामाला लावण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांची माझ्याकडे मागणी करण्यात आली. नगराध्यक्षपद गेल्यानंतर घरची परिस्थिती ढासळल्याने सुशीलाबार्इंनी रोजगार हमी योजनेत काम करण्यास सुरुवात केली. शेवटी एकवेळचे कुटुंबाचे पोट भरणे मुश्कील झाल्याने करमाळ्यातील घराला कुलूप ठोकून सुशीलाबाई २००७ साली पुण्यात गेल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणेMarketबाजार