शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी सोलापूरकर ; सोलापूरची प्रसिद्ध हुग्गी पुण्यात लोकप्रिय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:56 IST

विविध क्षेत्रांमध्ये दिसतोय सोलापुरी ठसा 

ठळक मुद्देपोटाची खळगी भरण्यासाठी सोलापुरातून पुण्यातसैन्य दलातून निवृत्त झालेले श्रीकांत बसलिंगय्या हिरेमठ हे मूळचे सोलापूरचेसोलापुरात उद्योग सुरू करणार- कलशेट्टी

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापुरातून पुण्यात गेलेल्या मंडळींनी केवळ नोकºयाच नव्हे तर विविध क्षेत्रांमध्ये आपला सोलापुरी ठसा उमटविला आहे. सैन्य दलातील नोकरीनंतर पुण्यात स्थायिक झालेले श्रीकांत हिरेमठ यांची हुग्गी तेथे लोकप्रिय होत आहे. भाग्यवंती उपहारगृहाच्या माध्यमातून ते पुण्यात स्थिरावले आहेत. 

सैन्य दलातून निवृत्त झालेले श्रीकांत बसलिंगय्या हिरेमठ हे मूळचे सोलापूरचे. ४-५ वर्षे त्यांनी विमा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी बाळीवेस येथील चौकात हुग्गी सेंटर सुरू केले. काही वर्षेच हा व्यवसाय चालला. पुणेकर मंडळी अस्सल खवय्ये असल्याने हुग्गी व्यवसायाला गती येईल, या अपेक्षेने त्यांनी पुण्यात भाग्यवंती उपहारगृह सुरू केले. जेवणात एक वाटी हुग्गी मिळत असल्याने पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला ३ वर्षे हॉटेलच्या जागेचे भाडे न घेणारे आबा जगताप यांच्यामुळेच आपण पुण्यात स्थिरावल्याचे हिरेमठ सांगतात.

सुनित नितीन मेहता हे तसे मूळचे तुळजापूर तालुक्यातील मंगरूळचे. व्यवसायानिमित्त ते सोलापुरात स्थायिक झाले. सोलापुरात काम करीत असताना तसा प्रतिसाद मिळत नव्हता. चुलते बिपीन मेहता यांच्याकडून बांधकाम व्यवसायाचे धडे घेतलेले सुनित मेहता यांनी ६-७ वर्षांपूर्वी पुणे गाठले. चुलते बिपीन यांची मोलाची साथ मिळाल्याने सुनित यांनी बांधकाम व्यवसायात उडी घेतली. कर्वे नगर भागात राहणाºया सुनितने अस्सल पुणेरी भाषा अवगत केली. आज पुणे, पिंपरी-चिंचवड भागात त्यांचे अनेक गृहप्रकल्प साकारले आहेत. शेवटी जिथे सुरुवात झाली, त्या कर्मभूमीचे ऋण व्यक्त करण्यासाठी सोलापुरात एखादा व्यवसाय सुरू करण्याचा मानस सुनित मेहता यांनी बोलून दाखवला. 

सोलापुरात उद्योग सुरू करणार- कलशेट्टी- सोलापुरातील स्व. इरणप्पा कलशेट्टी यांचा रॉकेलचा गाडा होता. दोन मुले, दोन मुली, पत्नीसह ८ बाय ८ च्या पत्र्याच्या खोलीत ते राहायचे. एम. कॉम.ची पदवी संपादन केलेले त्यांचे चिरंजीव मल्लिनाथ हे नोकरीच्या निमित्ताने १९९० साली पुण्यात गेले. काही कंपन्यांमध्ये उत्तम काम केल्यावर त्यांनी आता अनेक उद्योग सुरू केले आहेत. डेअरी प्रॉडक्ट्स, वाहन उद्योगाला लागणारे साहित्य बनविण्याची फौंड्रीही त्यांनी सुरू केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनेक सेवाभावी संस्थांवर कार्यरत असलेल्या मल्लिनाथ कलशेट्टी यांचा पुण्यात आयकॉन म्हणून गौरव झाला आहे. सोलापुरातील बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि पुण्याकडे येणारा लोंढा थांबावा, यासाठी सोलापुरात उद्योग सुरू करण्याचा विचार असल्याचे मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलून दाखवला. 

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणेhotelहॉटेल