शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील २२ टॉवेल कारखानदारांना पुण्याच्या कापड व्यापाºयांने गंडवले, २६.८५ लाखांची झाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:30 IST

पुण्याच्या कापड व्यापाºयाने सोलापुरातील २२ टॉवेल कारखानदारांकडून घेतलेल्या मालापोटीची रक्कम न देता २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयास गंडवल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदला आहे.

ठळक मुद्देनागनाथ पेंटप्पा गुंडला यांच्यासह अन्य २१ जणांचीही सुमारे २४ लाख २६ हजार ६९८ रुपये अशी एकूण २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयांची फसवणूकदीपक जैन असे गुन्हा नोंदलेल्या व्यापाºयाचे नाव

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : पुण्याच्या कापड व्यापाºयाने सोलापुरातील २२ टॉवेल कारखानदारांकडून घेतलेल्या मालापोटीची रक्कम न देता २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयास गंडवल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार १ ते २९ जून २०१७ या कालावधीत घडला आहे. दीपक जैन असे गुन्हा नोंदलेल्या व्यापाºयाचे नाव आहे. सोलापूरचे कारखानदार प्रभाकर रामकृष्ण सोमनाथ (रा. ५२३, साखर पेठ, सोलापूर) यांचा टॉवेल तयार करण्याचा कारखाना आहे. जुळे सोलापूर येथे राहणारे सोमनाथ वाले यांच्यामार्फत दीपक जैन या पुण्याच्या रेडिमेड व्यापाºयाशी त्यांची ओळख झाली. दीपक जैन हे वाले यांना रेडिमेड कपडे पुरवत असत. त्यांच्या सांगण्यावरून जैन यांच्या नाकोडा एंटरप्रायजेस व रत्नदीप टेक्स्टाईल, पुणे यांना फिनिक्स क्लासिक, उंदरी चौक, ता. हवेली, जि. पुणे या पत्त्यावर टॉवेल पुरवणे व रोखीने पैसे घेणे हा व्यवहार सुरू झाला. पहिले सहा महिने रोखीने व्यवहार झाला. यातून विश्वास निर्माण झाल्याने कधी रोखीने, कधी बँक खात्यावर पैसे जमा व्हायचे. जून २०१७ नंतर मात्र पैशास विलंब व्हायला लागला. फोन करूनही काही दिवसात पैसे मिळतील, असे सांगत कालांतराने टाळणे सुरू झाले. यावर प्रत्यक्ष पुणे येथे त्यांच्या फर्मशी संपर्क साधला असता ते बंद असल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक झाल्याबद्दल सोमनाथ यांनी आपली २ लाख ५९ हजार २८० रुपये फसवणूक झाल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधून फिर्याद दिली आहे. अशाच प्रकारे नागनाथ पेंटप्पा गुंडला यांच्यासह अन्य २१ जणांचीही सुमारे २४ लाख २६ हजार ६९८ रुपये अशी एकूण २६ लाख ८५ हजार ९७८ रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत. ------------------------योजनेचे आमिष दाखवून १.३३ लाखांची फसवणूक- आॅईल फॅक्टरी योजनेत वार्षिक ३३ हजार ४०० रुपये गुंतवणूक करा, दरमहा पाच हजार मिळवा असे आमिष दाखवून फसवणूक केल्याबद्दल अतुल सुभाष कुलकर्णी (रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील आरोपीने फिर्यादी सलीम अमीर पठाण (रा. लोकमान्यनगर, सोलापूर) यास वरीलप्रमाणे आमिष दाखवले. सलीम याने विश्वासाने १ लाख ३३ हजार ६०० रुपये गुंतवले. मात्र आरोपीने पैसे स्वत:साठी वापरून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस