शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील ६१ हजार रुग्णांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 16:44 IST

सहा वर्षे पूर्ण : सोलापूर जिल्ह्याला मिळाले २२२ कोटी

ठळक मुद्देउपचारापोटी रुग्णालयांना २२२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपये मिळालेएम. डी. इंडिया कंपनीतर्फे क्लेम स्वीकारले जातातसोलापूर जिल्ह्यात २४ रुग्णालयात ही सोय करण्यात आली

सोलापूर : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील ६० हजार ५०९ रुग्णांनी लाभ घेतला आहे. या माध्यमातून उपचारापोटी रुग्णालयांना २२२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपये मिळाले आहेत. 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेला (पूर्वीचे नाव राजीव गांधी जीवनदायी ) २ जुलै रोजी सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. २ जुलै २०१२ रोजी ही योजना राज्यातील ८ जिल्ह्यांत त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ रोजी २८ आणि ३ जून २०१६ रोजी इतर १४ जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली. सोलापूरचा सुरुवातीलाच समावेश करण्यात आला होता.

एम. डी. इंडिया कंपनीतर्फे क्लेम स्वीकारले जातात. यासाठी सोलापूर जिल्ह्यात २४ रुग्णालयात ही सोय करण्यात आली आहे. प्रामुख्याने २८ आजारांवर आतापर्यंत उपचार केले गेले आहेत. पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना या योजनेंतर्गत उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. अशा रेशन कार्डमध्ये नाव असलेले रुग्ण उपचारासाठी संबंधित रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची नोंद घेण्यासाठी आरोग्यमित्र २४ तास उपलब्ध आहेत.

रुग्णाची नावनोंदणी करून ओळखपत्र व रेशनकार्डाची खातरजमा करून उपचाराची व्यवस्था करण्याची जबाबदारी आरोग्य मित्रांवर आहे. रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. रमेश सोनवणे व एम. डी. कंपनीतर्फे निवृत्त पोलीस अधिकारी शिवशरण गवंडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरात या योजनेचा १७  लाख १० हजार १५० रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या उपचारासाठी ३७८४ कोटी ८८ लाख ४० हजार ६२१ इतकी रक्कम क्लेमपोटी रुग्णालयाकडे जमा करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात होत आहे जनजागृती- या योजनेतून असाध्य आजारांवर उपचार घेण्याबाबत ग्रामीण भागात जनजागृती झाली आहे. पिवळे व केशरी रंगाचे रेशनकार्ड असणारे  सदस्य आपल्या आजारावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत तपासणी करून उपचार घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. महिलांमध्ये मासिक पाळी, पोटाचे विकार व कर्करोगाच्या आजारांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना हृदयासंबंधी येणाºया अडचणींवर विविध रुग्णालयात उपचार सुविधा देण्यात येत आहे.

पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यावर समाजसेवा म्हणून या कंपनीचे काम स्वीकारले. आतापर्यंत अनेक गरजूंना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. कोणास अडचणी येत असतील तर संपर्क करावा.- शिवशरण गवंडी, जिल्हाप्रमुख, आरोग्य विमा 

टॅग्स :SolapurसोलापूरMedicalवैद्यकीयgovernment schemeसरकारी योजनाHealthआरोग्य