शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

गावाकडे ट्रॅक्टर चालवित तो झाला पीएसआय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 18:15 IST

राजीव लोहोकरे  अकलूज :  घरची हालखी परस्थिती त्यात वाट्याला शैक्षणिक  अपयश़ गावाकडे टॅक्टर चालविला, हाती मिळेल ते काम केले, ...

ठळक मुद्देजिद्दी आणि जीवनात खडतर प्रवास करणाºया तरुणाचे नाव आहे किशोर चव्हाण.किशोरचे मूळ गाव तोंडले-बोंडले (ता. माळशिरस). मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्म़ पोलीस खात्यात अधिकारी होण्याची प्रबळ इच्छा

राजीव लोहोकरे 

अकलूज :  घरची हालखी परस्थिती त्यात वाट्याला शैक्षणिक  अपयश़ गावाकडे टॅक्टर चालविला, हाती मिळेल ते काम केले, पण पीएसआय होण्याची जिद्द सोडली नाही. अशा जिद्दी आणि जीवनात खडतर प्रवास करणाºया तरुणाचे नाव आहे किशोर चव्हाण.

किशोरचे मूळ गाव तोंडले-बोंडले (ता. माळशिरस). मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्म़ पोलीस खात्यात अधिकारी होण्याची प्रबळ इच्छा होती. पण परिस्थिती बेताचीच़ माध्यमिक शिक्षणानंतर उच्च माध्यमिक शिक्षण घेताना १२ वीत नापास़ पुढेचे शिक्षण सोडले, पण  पोलीस अधिकारी होण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती़ पुन्हा १२ वी परीक्षा देवून उत्तीर्ण झालो़ परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. ट्रॅक्टर चालविला, दोन वर्षे शेती केली, यश आले नाही. पुढे तीन वर्षांनी पदवी पूर्ण केली.

२ ते ४ गुण कमी मिळाले; पदरी निराशाचपदवीनंतर गावातल्या सोसायटीत लिपिक म्हणूनही काही दिवस नोकरी केली. पोलीस खात्यात जाण्यासाठी दोन वेळा पोलीस भरतीला गेलो, केवळ २ ते ४ गुण कमी मिळाल्याने अपयश पदरी निराशा आली.  कधी पूर्व परीक्षेला यश पण मुख्य परीक्षेत अपयश यायचे. दोन वेळा नापास झालो. परंतु निराश झालो नाही़ अभ्यास करीत राहिलो, मनाशी जिद्दीच बाळगली होती की अधिकारी होवूनच परतायचे. याच जोरावर २०१७ च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली अन् तिसºया प्रयत्नात यश मिळाले.

गावात वाया गेलेले पोर म्हणनारे लोक आता साहेब म्हणून हाक मारु लागले़ यातच सार काही आल. या यशामधे शंकरराव मोहिते महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे़ कारण आयुष्याची महत्वाची वळणे इथच शिकलो़ अभ्यासाची प्रेरणा इथेच मिळाली. जीवनातील पारिजात बहरला. जरी मी पुण्यात बहरलो असलो तरी माझ्या जीवनाच्या वेलावरील प्राजक्ताची फुले ही शंकरराव मोहिते महाविद्यालयातच लागली होती. हिरोगिरी करून झिरो होण्यापेक्षा झिरोतून हिरो व्हायचे़ आई वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे असा विचार घेवून जीवनाची यशस्वी वाटचाल करीत आहे.

 - किशोर चव्हाण़, पोलीस उपनिरीक्षक

टॅग्स :SolapurसोलापूरMPSC examएमपीएससी परीक्षाEducationशिक्षण