शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

सोलापुरात पुनश्च स्टे होम; पुन्हा संचारबंदी लागू करणे म्हणजे पुनश्च हरिओम...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:15 IST

सोलापूरकरांनो शहाणे व्हा : अख्ख्या महाराष्ट्रात फक्त इथंच संचारबंदीची वेळ का येतेय ?

ठळक मुद्देशहरात कोरोनाचे रुग्ण, मृत्यू वाढत आहेत. वारंवार सांगूनही लोक मास्क वापरत नाहीतदुचाकीवर डबल सीट जाऊ नका म्हटले तरी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन फिरत आहेतज्येष्ठ नागरिकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे. अनेक दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक तोंडाला मास्क न लावता बसलेले असतात

सोलापूर : एकीकडे देश अनलॉक होत असताना सोलापुरात मात्र पुन्हा थोडी नव्हे तर चक्क १५ दिवस संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे पाठविला आहे. सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमधली वाढ हे प्रशासन यंत्रणेच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत असल्यामुळे ‘पुनश्च स्टे होम’चा संदेश प्रशासनाच्या वतीने दिला जात आहे. तीन महिन्यांनंतर सुरू झालेले उद्योग-व्यापार रुळावर येत असताना पुन्हा संचारबंदी लागू करण्याच्या निर्णय म्हणजे पुनश्च हरिओम.

महापालिकेची आरोग्य यंत्रणा विविध प्रकारच्या कामात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. याला नागरिकांच्या निष्काळजीपणाबरोबरच प्रशासनही जबाबदार आहे. सुरुवातीपासून प्रशासनाने वेगवान हालचाली केल्या असत्या तर कोरोनाला नक्कीच प्रतिबंध करता आला असता. परंतु सोलापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ही साथ पसरेल, असे कोणालाही वाटले नव्हते.

पोलीस, जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य यंत्रणा हे सर्वच खाते गाफील राहिले. त्यात सोलापुरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीचा भाग आहे, हेही कोणी लक्षात घेतले नाही. कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्यानंतर अधिकारी बदलले जात आहेत. महापालिकेच्या नवीन आयुक्तांचा चांगला प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांना सोलापूर शहराची नेमकी माहिती घ्यावी लागेल. शहराची अर्थव्यवस्था आणि जनमानसाचा नेमका कानोसा घेता आला तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे म्हणता येईल.---------------प्रशासकीय यंत्रणा ढेपाळली..शहरातील एखाद्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास या परिसराला तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र केले जात नाही. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील रुग्णांना तत्काळ क्वारंटाईन केले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. प्रतिबंधित क्षेत्रात निर्जंतुकीकरणाचे काम तत्काळ होत नाही. नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम केले जात नसल्याचे सांगितले जाते. अधिकारी कामचुकारपणा करीत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अशा अनेक अधिकाºयांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

शहरात कोरोनाचे रुग्ण, मृत्यू वाढत आहेत. वारंवार सांगूनही लोक मास्क वापरत नाहीत. दुचाकीवर डबल सीट जाऊ नका म्हटले तरी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन फिरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे. अनेक दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक तोंडाला मास्क न लावता बसलेले असतात. त्या दुकानासमोर मोठी गर्दी असते. त्यामुळे आम्हाला पुन्हा लॉकडाऊन घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. विनंती करूनही लोक ऐकायला तयार नसल्याने हा निर्णय घेण्याची वेळ येत आहे. यासंदर्भात अधिकाºयांशी चर्चा सुरू आहे. पुन्हा लॉकडाऊन घ्यायचा प्रस्ताव शासनाला पाठवत आहोत. - पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका