शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या खासदारांना तात्पुरता दिलासा; जात पडताळणीच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 15:24 IST

पुन्हा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश; बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाची ८ एप्रिल रोजी होणार पुन्हा सुनावणी

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या निर्णयाला दि.८ एप्रिल पर्यंत स्थगिती दिली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावरून  सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच तपास चालुच राहणार दरम्यान जात पडताळणी समिती पुन्हा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करेल

सोलापूर : लोकसभा निवडणूकीत बेडा जंगम जातीचा बनावट दाखला सादर केल्याचा, जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जात पाडताळणी समितीने पुन्हा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर दि.८ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. 

सोलापूर लोकसभा निवडणूक २0१९ मध्ये अनुसूचित चाती प्रवर्गातून खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेड जंगम हा जातीचा दाखला सादर केला होता. हा जातीचा दाखला बोगस असल्याचा अक्षेप रिब्लिकन पार्टी आॅफ इंडीया (पी.जी) चे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी घेतला होता. समाज कल्याण विभागातील जात पडताळणी समितीने केलेल्या चौकशीत, बेडा जंगम हा जातीचा दाखला बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी जात पडताळणी समितीने अक्कलकोटचे प्रभारी तहसिलदारांना न्यायालयात फिर्याद देण्याच्या सुचना केल्या होत्या. प्रभारी तहसिलदारांनी सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. न्यायालयात यावर सुनावली होऊन सदर बझार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

न्यायालयाच्या आदेशावरून सदर बझार पोलीस ठाण्यात भांदवि कलम ४२0, ४६५, ४६७, ३४ प्रमाणे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, तहसील कार्यालय उमरगा, जि. उस्मानाबादचे तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी, अक्कलकोटचे तहसिल कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्या विरूद्ध दि.५ मार्च २0२0 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. दि.११ मार्च २0२0 रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही पक्षाकडुन युक्तीवाद करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या निर्णयास अंतरीम स्थगिती देवुन पुढील सुनावणी दि.८ एप्रिल २0२0 रोजी ठेवली आहे. या प्रकरणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडुन अ‍ॅड. प्रसाद ढाकेफाळकर, अ‍ॅड. संतोष न्हावकर, अ‍ॅड. महेश स्वामी, अ‍ॅड. अनुप पाटील, अ‍ॅड. महेश देशमुख यांनी तर तक्रारदारातर्फे अ‍ॅड. श्रीहरी अणे, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी काम पाहिले. 

न्यायव्यवस्थेने संपूर्ण पुरावे पाहुन दिलेली स्थगिती ही खासदारांच्या बाजुने किती बळकट आहे हे दर्शवते. एकांगी आणि विरोधी बातम्या मिडीयाला पुरवुन एक खोटं चित्र तयार केलं गेलेलं होतं ते आता उघड पडलं आहे. खासदार महास्वामींची बाजू खरी आहे की खोटी हे दि.८ एप्रिलच्या सुनावणी दरम्यान कळेल. अ‍ॅड. संतोष न्हावकर

मुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या निर्णयाला दि.८ एप्रिल पर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावरून  सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच तपास चालुच राहणार आहे. दरम्यान जात पडताळणी समिती पुन्हा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करेल. प्रमोद गायकवाड, तक्रारकर्ते 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय