शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसाठी श्राद्ध घालून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध

By दिपक दुपारगुडे | Updated: April 27, 2023 18:32 IST

महूद येथील कासाळ ओढा : पुलावर मध्यभागी पडले जीवघेणे खड्डे

दीपक दुपारगुडे, सोलापूर : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं कसं ओके’मध्ये आहे. या डायलॉगने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले सांगोल्याचे लोकप्रतिनिधी यांच्या होम पिचवर मात्र ‘नाॅट ओके हाय’. महूद-अकलूज रस्त्यावरील कासाळ ओढ्यावरील पुलावर मध्यभागी जीवघेणी खड्डे पडून अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संतप्त तरुणांनी पुलाच्या ठिकाणी चक्क श्राद्ध घालून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध व्यक्त केला.

जत-सांगोला-अकलूज ते इंदापूर मार्गे पुण्याला जोडणारा हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ९६५ वरील महूद- अकलूज या मार्गावरील कासाळ ओढ्यावरील पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलाच्या बांधकामाच्या स्लॅबला तडे गेले आहेत. कोठेही संरक्षक कठडे नाहीत. त्यातील अँगल, सळई उघड्या पडल्याने हा पूल कोणत्याही क्षणी ढासळण्याच्या मार्गावर आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे पुलावरून थेट खोल ओढ्यात वाहने पडून अनेक अपघात झाले आहेत.

या धोकादायक पुलावरून रात्रंदिवस प्रवासी वाहतुकीसह जड वाहतूक सुरू असते. या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावातील तरुणांनी चक्क पुलाखाली ओढ्यात बसून पुरोहिताकडून श्राद्ध घातले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक नेते कैलास खबाले, काकासाहेब नागणे, हनुमंत येडगे, नैनेश कांबळे, अजय चव्हाण, नागेश कांबळे, विवेक देशपांडे, मयूर बाजारे, भैया माने आदी उपस्थित होते.अद्यापही दुरवस्था संपली नाही...

सांगोला-महूद-अकलूज महामार्गाच्या दुरुस्तीसाठी वारंवार आंदोलने करावी लागत आहेत. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही या मार्गाची दुरवस्था संपलेली नाही. त्यातच महूद येथील कासाळ ओढ्यावरील हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने तो कधीही कोसळून दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे नव्याने पूल उभा करण्याची गरज आहे, असे कैलास खबाले यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Solapurसोलापूर