शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पूल जमीन मोजणीचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयामध्ये पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:08 IST

सोलापूर महानगरपालिका पदाधिकाºयांची अनास्था; नितीन गडकरींनी चार वर्षांपूर्वी मंजूर केले पूल

ठळक मुद्देजुना पुणे नाका ते पत्रकार भवन चौक आणि जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला यादरम्यान दोन उड्डाण पूल मंजूर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या कामासाठी निधी देणार आहे तर महापालिकेने भूसंपादन करून द्यायचे आहेया कामाची निविदा १४ नोव्हेंबर २०१७ रोजी काढण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिय पूर्ण न झाल्याने निविदा प्रक्रिया खुली करण्यात आली नाही

सोलापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी दोन उड्डाण पूल मंजूर केले होते. या कामाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने निधीही पाठविला आहे. परंतु, मनपा अधिकारी आणि पदाधिकाºयांमध्ये ताळमेळ नसल्याने भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीचा प्रस्ताव एक महिन्यापासून नगरसचिव कार्यालयात पडून आहे. ६ आॅगस्ट रोजी होणाºया सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर हा विषय घेण्यात आलेला नाही. 

जुना पुणे नाका ते पत्रकार भवन चौक आणि जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला यादरम्यान दोन उड्डाण पूल मंजूर झाले आहेत. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या कामासाठी निधी देणार आहे तर महापालिकेने भूसंपादन करून द्यायचे आहे. या कामाची निविदा १४ नोव्हेंबर २०१७ रोजी काढण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिय पूर्ण न झाल्याने निविदा प्रक्रिया खुली करण्यात आली नाही. भूसंपादनासाठी ३०० कोटी रुपयांची गरज आहे.

 राज्य सरकारने आॅक्टोबर २०१८ मध्ये यासाठी २०९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. उर्वरित ८९ कोटी रुपये महापालिकेला भरायचे आहेत. राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यात अध्यादेश काढला. मात्र, प्रत्यक्षात मार्च २०१९ मध्ये निधी वर्ग करण्यात आला. निधी मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची अधिसूचना जाहीर केली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला.

 लोकसभा निवडणुकीनंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. बाधित होणाºया मिळकतींचे भूसंपादन कार्यालय आणि महापालिकेकडून संयुक्त मोजणी होणार आहे. यासाठी ७३ लाख रुपयांची आवश्यकता आहे. महापालिकेने  हा निधी नगरभूमापन कार्यालयाकडे वर्ग करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार सहायक नगररचना कार्यालयाने प्रस्ताव तयार करून महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे पाठविला. निधी वर्ग करण्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी १३ जून    रोजी हा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडे पाठविला, पण अद्यपही हा विषय सभेच्या अजेंड्यावर आलेला नाही. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नगर भूमापन कार्यालयाच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. 

कामाची किंमत वाढण्याची शक्यता - उड्डाण पुलाच्या भूसंपादनाचा विषय महापालिकेच्या पदाधिकाºयांनी तातडीने पूर्ण करुन घ्यावा, असे आदेश भाजपच्या नेत्यांनी दिले होते. परंतु, मनपाच्या सहायक नगररचना कार्यालयातून याबाबतचा प्रस्ताव देण्यास विलंब लावण्यात आला. याबाबत पदाधिकाºयांनी पाठपुरावा केला नाही. आता भूसंपादनासाठी संयुक्त मोजणीचे पैसे भरण्यास विलंब लावला जात आहे. दीड महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे भूसंपादनाचे काम रखडणार आहे. या गोंधळात उड्डाण पुलाच्या कामाची किंमत वाढणार आहे. त्यामुळे हे काम प्रलंबित राहण्याची भीती राष्टÑीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली. 

गडकरी बैठक घेणार - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुरुवारी सोलापूर दौºयावर येणार आहेत. या दौºयात ते राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत. त्यात उड्डाण पुलाच्या विषयाची चर्चा होणार आहे. 

प्रशासनाकडून प्रस्ताव आलेला आहे. सहा आॅगस्ट रोजी होणाºया सभेच्या अजेंड्यावर हा विषय घेण्यात आलेला नसला तरी याबाबत आम्ही माहिती घेत आहोत. पुरवणी विषयपत्रिकेत हा विषय घेण्यात येईल. - शोभा बनशेट्टीमहापौर

टॅग्स :SolapurसोलापूरNitin Gadkariनितीन गडकरीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका