शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पदवीव्दारे मिळवली पदोन्नती; सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांचा शोध सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 13:31 IST

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची माहिती; आरोग्य, शिक्षण विभागाचाही आढावा घेणार

ठळक मुद्देबांधकाम खात्यातील ५५ कर्मचाºयांनी बोगस पदव्या धारण करून पदोन्नती मिळविल्याचे निदर्शनाला आलेतत्कालीन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेमुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी बांधकाम विभागाकडून अशा कर्मचाºयांबाबत माहिती मागितली

सोलापूर :  जिल्हा परिषदेत बोगस पदवी धारण करून पदोन्नती मिळविलेल्या कर्मचाºयांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

जिल्हा परिषदेच्या २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत उमेश पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. बांधकाम खात्यातील ५५ कर्मचाºयांनी बोगस पदव्या धारण करून पदोन्नती मिळविल्याचा आरोप त्यांनी केल्यामुळे खळबळ उडाली होती. 

झेडपीच्या सेवेत असताना कॉलेजमध्ये दररोज उपस्थित राहून या कर्मचाºयांनी पदव्या कशा मिळविल्या अन् त्यांना पदोन्नती कोणत्या आधारावर देण्यात आली याची चौकशी करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली होती. विरोधी  पक्षनेते बळीराम साठे यांनी फक्त बांधकाम खातेच काय इतर खात्यातही अशा अनेक भानगडी असल्याचे निदर्शनाला आणले होते. यावर तत्कालीन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 

सभेतील चर्चेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी बांधकाम विभागाकडून अशा कर्मचाºयांबाबत माहिती मागितली आहे. कार्यकारी अभियंता कदम यांनी अशाप्रकारे पदोन्नती झालेल्या कर्मचाºयांच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. प्राथमिक चौकशीत असे १५ कर्मचारी असल्याचे आढळले आहे. 

याबाबत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सुभाष माने यांनी अनेक शिक्षकांनी कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्र देऊन पदोन्नती मिळविल्याचे निदर्शनाला आणले होते तर वसंतनाना देशमुख यांनी तर आरोग्य खात्यातही मोठ्या भानगडी असल्याचा आरोप केला होता. नुसते बांधकाम नव्हे तर शिक्षण व आरोग्य खात्यातील पदोन्नतीची चौकशी केली जाणार असल्याचे वायचळ यांनी स्पष्ट केले. 

निधी खर्चाला प्राधान्य- प्रशासनाच्या हातात आता केवळ तीन महिने राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागाकडे आलेल्या निधीचा व खर्चाचा आढावा घेतला जात आहे. विविध योजनांसाठी आलेला निधी जास्तीतजास्त खर्च व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी सांगितले. त्यामुळे सर्वच विभागाकडून फायली मागविण्यात येत आहेत. मुख्य लेखा विभागालाही खर्चाबाबत आढावा घेण्यासाठी विभागप्रमुखांना सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदfraudधोकेबाजीGovernmentसरकारjobनोकरी