शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सोलापूरमधील ‘इलेक्ट्रो’मध्ये अत्याधुनिक उपकरणांची खरेदी जोमात , आज समारोप, पाच दिवसांत ५० हजार ग्राहकांनी दिल्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:51 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६  : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘इलेक्ट्रो-२०१८’ या प्रदर्शनास पाच दिवसांत ५० हजार ग्राहकांनी भेटी दिल्या. सर्व कंपन्यांच्या एकापेक्षा एक इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेसच्या अत्याधुनिक वस्तूंच्या प्रदर्शनात ग्राहक जोमात खरेदी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आज सहाव्या ...

ठळक मुद्देसव्वा एकर परिसरात सुमारे ३०० स्टॉल लावण्यात आले आहेतसर्व कंपन्यांच्या एकापेक्षा एक इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेसच्या अत्याधुनिक वस्तूंच्या प्रदर्शनयंदाच्या वर्षी प्रदर्शनात खूप सुधारणा केल्या आहेत़ त्यामुळे ग्राहक समाधानी आहे : सतीश मालू,

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६  : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘इलेक्ट्रो-२०१८’ या प्रदर्शनास पाच दिवसांत ५० हजार ग्राहकांनी भेटी दिल्या. सर्व कंपन्यांच्या एकापेक्षा एक इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेसच्या अत्याधुनिक वस्तूंच्या प्रदर्शनात ग्राहक जोमात खरेदी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आज सहाव्या दिवशी या प्रदर्शनाचा समारोप होत आहे. सव्वा एकर परिसरात सुमारे ३०० स्टॉल लावण्यात आले आहेत. घरगुती आवश्यक असलेली विविध कंपन्यांची उपकरणे पाहावयास व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. गुडगाव, दिल्ली येथील कारागिरांनी कंपनीच्या रचनेनुसार आकर्षक पद्धतीने स्टॉल मांडले आहेत. साध्या इस्त्रीपासून टी.व्ही., फ्रीज, कुलर आदी अनेक गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन पाहून ग्राहकांना खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. ग्राहकांना स्टॉल पाहण्यासाठी आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. ग्राहकांना ठिकठिकाणी बसण्यासाठी सोफासेट, पिण्याच्या पाण्याची आणि सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पॉइंट करण्यात आले आहेत. एकाच छताखाली सर्व कंपन्यांच्या वस्तू पाहण्याची व खरेदी करण्याची सुवर्णसंधी सध्या सोलापूरकरांना मिळत आहे. ---------------यंदाच्या वर्षी प्रदर्शनात खूप सुधारणा केल्या आहेत़ त्यामुळे ग्राहक समाधानी आहे. दरवर्षी तिकीट खरेदी करण्यासाठी काउंटरवर मोठी गर्दी होत असते़ यंदा आॅनलाईनचीसुद्धा सोय केल्याने ग्राहकांना सोईचे झाले आहे. अंतर्गत गार्डन, रस्ते सुटसुटीत केले आहेत. संपूर्ण असोसिएशन यासाठी परिश्र घेत आहे़                                          - सतीश मालू,                                      सुयोग इलेक्ट्रॉनिक्स.----------------सेडाच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच हा एक उपक्रम आहे. या प्रदर्शनात शहरातील सेडाच्या प्रत्येक सदस्याला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यात आला आहे. ग्राहकांना सर्व कंपन्यांचे ब्रॅण्ड या ठिकाणी पाहावयास व खरेदी करण्यास मिळत आहेत़ ग्राहक समाधानी होऊन जात आहेत.-खुशालचंद देढीया, अध्यक्ष, सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन. ------------------------वर्षातून एकदा होणाºया इलेक्ट्रो प्रदर्शनाचे सहा दिवस आमच्यासाठी एका उत्सवाप्रमाणे असतात. ज्या पद्धतीने आपण एखाद्या सणाची वाट पाहतो त्याप्रमाणे आम्ही या प्रदर्शनाची वाट पाहत असतो. या प्रदर्शनात सर्व कंपन्यांच्या वस्तूंची विक्री होते. यातून अडीच ते तीन हजार लोकांना रोजगार मिळतो. कमवा, शिका या योजनेप्रमाणे विद्यार्थी प्रदर्शनात काम करतात. लाखो ग्राहकांना याचा फायदा होतो. -शिवप्रकाश चव्हाण, माजी अध्यक्ष, सेडा---------------------इलेक्ट्रो प्रदर्शन सोलापूरच्या ग्राहकांसाठी एक मोठी पर्वणी असते. आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची खरेदी या ठिकाणी करता येते. या ठिकाणी येणारा प्रत्येक ग्राहक आनंदी होऊन जातो. शहर व ग्रामीण भागातून लाखो ग्राहक प्रदर्शनास भेट देत आहेत. ग्राहकांचे समाधान हाच असोसिएशनचा उद्देश आहे.                              -जितेंद्र राठी, चेअरमन, सेडा

टॅग्स :Solapurसोलापूर