शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या कमी असलेल्या सोलापूर शहरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 12:08 IST

पटसंख्या कमी असलेल्या सोलापुरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील २१ शाळा असून, मनपा हद्दीतील पाच शाळांचा त्यात समावेशसोलापुरातील पुढील खासगी शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येत आहेसमायोजन करण्याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी पत्राद्वारे सूचना

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५  : पटसंख्या कमी असलेल्या सोलापुरातील पाच शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना दिली. गुणवत्ता असलेल्या शाळांमध्ये पट वाढत आहे तर दुसरीकडे कमी गुणवत्तेच्या शाळेतील पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सामाजीकरण होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व महाराष्ट्र बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षण हक्क नियम २०११ मधील तरतुदीचे उल्लंघन न करता या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजन करून त्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील २१ शाळा असून, मनपा हद्दीतील पाच शाळांचा त्यात समावेश होत आहे. अशाप्रकारे समायोजन करण्याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी ३० नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे काम सुरू झाले आहे. सोलापुरातील पुढील खासगी शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येत आहे. महात्मा बसवेश्वर प्री. प्रायमरी स्कूल (पटसंख्या: ९, शिक्षक: ६), समायोजन सह्याद्री प्रशाला, दमाणीनगर, विद्या विकास प्राथमिक शाळा व बालक मंदिर (पटसंख्या: ९, शिक्षक: १), समायोजन: लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळा, चेतना मराठी विद्यालय (पट: ६, शिक्षक: २), समायोजन: अण्णासाहेब पाटील प्रशाला, रामवाडी, वडार समाज प्रायमरी (पट: ७, शिक्षक: २), समायोजन: दमाणी विद्या मंदिर, जैन गुरुकुल प्रशाला, ज्ञानोदय विद्यालय (पट: ८, शिक्षक: ३) समायोजन: कुचन प्रशाला, रविवार पेठ. संबंधित शाळेत बंद करण्यात आलेल्या शिक्षकांची पदस्थापना पुढील समायोजन प्रक्रिया होईपर्यंत व विद्यार्थ्यांचे ज्या शाळेत समायोजन केले आहे, त्याच शाळेत करण्यात येईल. -----------------मनपा शाळेला मिळतील शिक्षकसंबंधित शिक्षकांचे वेतन त्याच शाळेतून निघणार आहे. पण या शिक्षकांचे समायोजन करताना संबंधित शाळेत मंजूर पदानुसार रिक्त पद असेल तरच समायोजन होणार आहे. अन्यथा मनपातील रिक्त पदावर प्राधान्यक्रमानुसार संबंधित शिक्षकास तात्पुरते समायोजित करण्याचे शिक्षणाधिकाºयांनी सूचित केले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासन अधिकारी साळुंके यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका