शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापुरात; व्यासपीठ, सभा स्थळावरील तयारीला वेग

By appasaheb.patil | Updated: January 16, 2024 15:22 IST

हेलिपॅड, व्यासपीठ, आसन व्यवस्था, स्वच्छता, पोलिस बंदोबस्त, नागरिकांची व्यवस्था आदी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन वेगाने तयारी करीत आहेत.

सोलापूर : रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेेंतर्गत ३० हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण १९ जानेवारीला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, केंद्र व राज्यातील महत्त्वाचे अधिकारी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. हेलिपॅड, व्यासपीठ, आसन व्यवस्था, स्वच्छता, पोलिस बंदोबस्त, नागरिकांची व्यवस्था आदी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन वेगाने तयारी करीत आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच दोन दिवस अगोदर एसपीजी अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची जवळपास १०० जणांची टीम आज सोलापुरात दाखल होणार आहे. त्यांची करडी नजर असणार आहे. एसपीजी टीम विविध कामांचा व सुरक्षेचा आढावा घेणार आहे. रे नगर येथे घरकुल वितरण कार्यक्रम होत असलेल्या जागेवर व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी व्यासपीठ व व्यासपीठाच्या पाठीमागे आवश्यक कॅम्प ऑफिस, ग्रीन रूम उभारण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थी साठी एन्ट्री पॉईंट व एक्झिट पॉईंट निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी सूचना फलक लावण्यात येणार आहेत. 

रेनगर फेडरेशनच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता कळवली असल्याने त्या दृष्टीने सभा ठिकाणच्या परिसरात पंढरपूर येथून ४०० शौचालये आणून ठेवली जाणार आहेत. कार्यक्रमावेळी व कार्यक्रमानंतर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या रे नगर परिसरात जिल्हा प्रशासन व पोलिस अधिकारी ठाण मांडून विविध कामावर लक्ष ठेवून आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदी