शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी हे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात तरबेज आहेत, सुशीलकुमार शिंदे यांनी केली सोलापूरात टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:44 IST

काँग्रेस सरकारच्या काळात अनेक विकासाच्या योजना झाल्या ,पण आम्ही त्याचे कधी मार्केटिग केले नाही , याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी न केलेल्या कामाची उदघाटने करीत श्रेय लाटतात ,अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

ठळक मुद्देन केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची परंपरा भाजपात आहेआमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही स्थानिक भाजपा नेत्यांचा समाचार घेतलाकाँग्रेस सरकारच्या काळात अनेक विकासाच्या योजना झाल्या ,पण आम्ही त्याचे कधी मार्केटिग केले नाही : सुशीलकुमार शिंदे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : काँग्रेस सरकारच्या काळात अनेक विकासाच्या योजना झाल्या ,पण आम्ही त्याचे कधी मार्केटिग केले नाही , याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी न केलेल्या कामाची उदघाटने करीत श्रेय लाटतात ,अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.         अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे होते. सोलापूर लोकमतचे संपादक राजा माने यांच्यासह लोकप्रतिनिधीची यावेळी उपस्थिती होती.       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना शिंदे म्हणाले , सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग मी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला ,त्याचे उदघाटन मात्र पंतप्रधानांनी केले ,अशी अनेक उदाहरणे शिंदे यांनी दिली. त्यांच्या भाषणाचा धागा पकडीत आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही स्थानिक भाजपा नेत्यांचा समाचार घेतला. कुरनुर धरण पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर तीन महिन्यांनी सुरू झाले ,पण त्याचे श्रेय ही मंडळी तत्कालीन भाजपा आमदारांना देतात , आजही अककलकोटमध्ये हाच प्रकार सुरू आहे.न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची परंपरा भाजपात आहे ,ती वरपासून पाळली जाते अशी कोपरखळी म्हेत्रे यांनी मारली.       वाचनालयाचे संस्थापक प पू गोरक्षनाथ महाराज यांनी मान्यवरांचा सत्कार केला़ अध्यक्ष नारायण चव्हाण यांनी प्रास्तविकातून वाचनालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सोलापूर मनपा पक्षनेते चेतन नरोटे , डिसीसी बँकेचे संचालक सुरेश हसापुरे , युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदीप चाकोते ,श्रीशैल नारोळे ,सरपंच आशाराणी गड्डे ,प्रहार जनशक्तीचे राजसाहेब चव्हाण यांची उपस्थिती होती़

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी