शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातीतल चर्चमध्ये अन् घरोघरी होेतेय येशू जन्माची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 14:38 IST

सोलापूर : ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या नाताळाची तयारी सर्वत्र सुरु आहे. घरोघरी आणि प्रार्थनास्थळांमध्ये येशू जन्माची अर्थात धार्मिक प्रवचन, ...

ठळक मुद्देख्रिस्ती बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या नाताळाची तयारी सर्वत्र सुरुधार्मिक प्रवचन, गाणी, कथा, नाटकांची युवा-युवतींमधून तयारी सुरूख्रिस्त बांधवांची आता प्रार्थनास्थळांमध्ये नाताळाच्या निमित्ताने गर्दी होऊ लागली

सोलापूर : ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या नाताळाची तयारी सर्वत्र सुरु आहे. घरोघरी आणि प्रार्थनास्थळांमध्ये येशू जन्माची अर्थात धार्मिक प्रवचन, गाणी, कथा, नाटकांची युवा-युवतींमधून तयारी सुरू झाली आहे.

दर रविवारी प्रार्थनेसाठी येणाºया ख्रिस्त बांधवांची आता प्रार्थनास्थळांमध्ये नाताळाच्या निमित्ताने गर्दी होऊ लागली आहे़ प्रत्येक चर्चकडून २० डिसेंबरपासून ते १ जानेवारी पर्यंतच्या धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची रुपरेषा, वेळापत्रक आखण्याचे काम सुरु आहे़ काही प्रार्थनास्थळांमध्ये रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत़ अशी परिस्थिती ख्रिस्ती बांधवांच्या घरीही दिसते आहे़ याबरोबरच दिवाळीप्रमाणे खाद्य पदार्थ, फराळ बनवण्याचे काम सुरू आहे़ काही कुटुंबात कपडे खरेदीही सुरू झाली आहे़ 

प्रार्थनास्थळांमध्ये २६ डिसेंबरपासून प्रवचन- शहरात २६ डिसेंबरपासून ख्रिस्तेतर बांधवांसाठीही काही प्रार्थनास्थळांमध्ये प्रवचन असते़ या ख्रिस्तेतर बांधवांना कधी निमंत्रण नसते; मात्र इतर धर्मियांची आपुलकी आणि श्रद्धा, प्रेम म्हणून हे लोक प्रार्थनास्थळात येतात, प्रवचन ऐकतात आणि चहा व मिठाई देऊन त्यांचे स्वागतही केले जाते़ तसेच ख्रिस्त बांधवांसाठी दररोज सायंकाळी विकास रणशिंगे हे प्रवचन देणार आहेत़ याची तयारी झाली आहे.

विद्यार्थ्यांकडून  येशू जन्मावर नाटिका - दी फर्स्ट चर्चसह अनेक चर्चमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरु आहे़ सोमवारी आणि मंगळवारी हिंदुस्थानी कॉन्व्हेंटचे विद्यार्थी भगवान येशू जन्मावर नाटिका सादर करणार केले. याबरोबरच बुधवार आणि गुरुवारी सेंट जोसेफचे विद्यार्थी देखील येशू जन्मावर नाटिका सादर करणार आहेत़ याची शाळांमधून तयारी सुरु झाली आहे़ 

२४ डिसेंबरपासून कॅरल सिंगिंग-  युवा-युवतींची एक फळी घरोघरी जाऊन सायंकाळी येशू जन्माची गाणी गातात़ याला कॅरल सिंगिंग असे संबोधले जाते़ २४ डिसेंबरपासून या कॅरल सिंगिगला सुरुवात होत आहे़ आबालवृद्ध नव्या पिढीला कथेच्या माध्यमातून येशू समजावून सांगितला जातो. या युवकांच्या फळीबरोबर एक सांताक्लॉज (सेंट निकोलस) ही असतो़ हा येताच दारात लहान मुलांचा गलका होतो आणि तो त्यांना चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करतो़ 

टॅग्स :SolapurसोलापूरChristmasनाताळ