शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इकडं स्वत:च्या घरी भावाच्या अंत्ययात्रेची तयारी; तिकडं वाचकांच्या घरी पेपर टाकण्याचीच स्वारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:39 IST

राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन; चैतन्य वाघमारेंसारख्या अनेक बांधवांच्या संघर्षाची अनोखी कहाणी

ठळक मुद्देसकाळी एक दिवस जरी हातामध्ये पेपर आला नाही तर त्या दिवशी करमत नाहीआपल्या हातात हा पेपर देण्यासाठी अनेक हात राबत असतातआपल्या ग्राहकांपर्यंत पेपर वेळेत पोहोचावा यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांची धडपड

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : बरोबर दोन वर्षांपूर्वी माझ्या सख्ख्या भावाचे निधन झाले होते. दुसºया दिवशी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. नातेवाईकांना अंत्यसंस्काराची माहिती दिली होती. ते येण्यापर्यंत वाट पाहावी लागणार होती. माझा भाऊ तर गेला होता, त्यामुळे मी दु:खात होतो. यासोबत मला आणखी एक चिंता होती, ती म्हणजे पहाटे ग्राहकांच्या घरी पेपर कोण देणार ? याची. कोणत्या घरी कोणता पेपर द्यायचा हे माझ्याशिवाय कुणालाच माहिती नव्हते. यामुळे काही झाले तरी आपल्या ग्राहकांपर्यंत पेपर पोहोचवायचा असा निश्चय केला. नेहमीप्रमाणे पहाटे उठून दत्त चौक येथे पेपर घेऊन घरोघरी वाटत असताना माझ्या घरी भावाच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु होती. हे करत असताना मला वाईट वाटत होते पण काम करणे गरजेचे होते, हा अनुभव चैतन्य वाघमारे यांनी सांगितला.

सकाळी एक दिवस जरी हातामध्ये पेपर आला नाही तर त्या दिवशी करमत नाही. आपल्या हातात हा पेपर देण्यासाठी अनेक हात राबत असतात. 

यापैकी महत्त्वाचा दुवा म्हणजे वृत्तपत्र विक्रेते. पेपर विक्रेते चैतन्य वाघमारे यांना जसे अनुभव आले, तसे अनेकांना अनुभव आले आहेत. आपल्या ग्राहकांपर्यंत पेपर वेळेत पोहोचावा यासाठी ही धडपड सुरु असते. पाऊस आणि थंडी याची पर्वा न करता आपली झोपमोड करत पहाटे चार ते सकाळी नऊपर्यंत राबतात. ग्राहकांच्या इतर तक्रारींनादेखील तोंड द्यावे लागते. ग्राहकांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात. जसे की पेपर गेटला अडकवला पाहिजे, पाऊस आला तर पेपर थेट घरात टाकायचा, पेपरला घडी पडू नये, रोज सकाळी आठच्या आतच पेपर यायला हवा, दुसरा पेपर आल्यास चालणार नाही, अशा अडचणींना पेपर विक्रेत्यांना तोंड द्यावे लागते. हे करत असतानाही कोणताही खंड न पडता आपल्या घरी रोज पेपर येत असतो. अशाच काही पेपर विक्रेत्यांनी सांगिलेला हा अनुभव...

मागील ४० वर्षांपासून घरोघरी पेपर देण्याचे काम करत आहे. हे काम आधी सायकलवर करायचो, आता गाडीवरुन करत आहे. कामाची इतकी सवय झाली आहे की याचा कधी त्रास वाटत नाही. सकाळी कामासोबत व्यायामही होतो. - राचप्पा आळंगे, वृत्तपत्र विक्रेते.

माझ्या वडिलांपासून पेपरचा व्यवसाय करत आहे. मी अभियंता असून, काही वर्षे सैनिक म्हणून काम केले, निवृत्त झाल्यानंतर पुन्हा हा व्यवसाय करत आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या वाड्या-वस्त्यापर्यंत पेपर पोहोचावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो.- उत्तम चौगुले, सांगोला, अध्यक्ष, जिल्हा पेपर विक्रेता संघ

पेपर वाटण्यासाठी मुले आली नसल्यास अनेक अडचणी येतात. मात्र वेळेत ग्राहकांच्या घरी पेपर पोहोचविणे गरजेचे असते. ग्राहकांकडून पेपरचे बिल घेणे तसे त्रासदायक असते. अनेकदा काही कारणे सांगून बिल नंतर देतो असे आश्वासन मिळते.- शिवाजी काकडे, बार्शी, वृत्तपत्र विक्रेते.

पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त अडचणी येतात. कित्तूर चन्नमानगर व स्वामी विवेकानंद परिसरात पावसामुळे चिखल होतो. यामुळे सायकल व गाडी चालविण्यास अडचणी निर्माण होतात तर अपार्टमेंटमध्ये चौथ्या-पाचव्या मजल्यावर जाऊन पेपर देणे जिकरीचे काम आहे.- शिवलिंग मेडेगार, अध्यक्ष वृत्तपत्र विक्रेता संघ आसरा.

पेपर वाटताना अडचणी आल्या तरी कारण सांगता येत नाही. ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे अंतिम लक्ष्य असते. पहाटे ४ वाजता सुरु झालेला प्रवास सकाळी १० वाजेपर्यंत सुरु असतो. एखाद्या दिवशी पेपर नाही दिला तर ग्राहक पेपर बंद करण्याची शक्यता असते.- चैतन्य वाघमारे, अध्यक्ष, सोलापूर शहर वृत्तपत्र विक्रेता बहुउद्देशीय संघ

आमचे कुटुंब हे १९५५ पासून या व्यवसायात आहे. सुरुवातीला पूर्ण शहरात पेपर देण्याचे काम करायचो. आता शहर मोठे झाल्याने शहराच्या मोठ्या भागात पेपर देतो. सकाळी ठराविक वेळेत पेपर देणे महत्त्वाचे असते.- दिलीप भागवत, वृत्तपत्र विक्रेता संघ आसरा.

टॅग्स :Solapurसोलापूर