शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
6
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
7
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
8
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
9
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
10
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
11
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
12
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
13
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
14
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
15
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
16
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
17
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
18
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
19
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
20
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

दंड भरण्याची तयारी

By admin | Published: July 24, 2014 1:23 AM

महापालिका : तत्कालीन आयुक्तांच्या चुकीमुळे वाढले जाई-जुई प्रकरण

सोलापूर : जनन व मृत्यू नोंदीप्रकरणी कामात हयगय केल्याप्रकरणी लेखा परीक्षकांनी केलेल्या दंडाबाबत महापालिकेने कोणतीही माहिती दिली नाही, असा खुलासा करीत जाई—जुई संस्थेने दंड भरण्याची तयारी असल्याचे पत्र महापालिकेस दिले आहे. तत्कालीन सहायक आयुक्तांच्या चुकीमुळे हे प्रकरण तापले असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने सन २00८ मध्ये जाई—जुई संस्थेत जनन व मृत्यू रेकॉर्ड संगणकीकृत करण्याचे काम दिले होते. हे काम ११ मार्च २00८ पर्यंत पूर्ण करून देण्याचा करार महापालिकेने केला होता; पण संस्थेच्या बीपीओ सेंटरच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने काम वेळेत झाले नाही. त्यामुळे संस्थेने काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागितली. २३ सप्टेंबर २00९ रोजी हा अर्ज दिला. महापालिकेच्या स्थायी समितीने त्याला मान्यता देऊन रजिस्टर संस्थेकडे सुपूर्द केले. त्यावर संस्थेने काम पूर्ण केले. त्यानंतर महापालिकेने संस्थेला १६ फेब्रुवारी २0१0 रोजी अनुभव प्रमाणपत्र व बिल अदा केले; पण जानेवारी २0१४ मध्ये झालेल्या लेखा परीक्षणात लेखा परीक्षकांनी संस्थेने कराराप्रमाणे काम केले नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्यांना दंड आकारावा, अशी शिफारस केली. ही शिफारस आल्यावर बिल अदा झाल्याने दंड माफ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला व हे प्रकरण पूर्वी स्थायी समितीमधून आल्याने कार्योत्तर मान्यतेसाठी पाठविण्यात आला. विषय चर्चेला आल्यावर हे प्रकरण बाहेर आले. स्थायी समितीने संस्थेला काम करण्यास मुदतवाढ दिली होती. त्यामुळे स्थायीच्या सभेत या विषयावर निर्णय झाल्यावर तो लेखा परीक्षकांकडे पाठविला जाईल. त्यांच्या सूचनेवरून पुढील निर्णय घेता येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर बिल काढताना कराराप्रमाणे काम झाले का नाही हे तपासणे आवश्यक होते. तत्कालीन सहायक आयुक्तांनी हे प्रकरण हाताळल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.----------------------------दंड भरुन घेता येणार नाही : अमिता दगडे-पाटीलजाई—जुई संस्थेने बुधवारी सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना पत्र देऊन दंड भरण्याची तयारी असल्याचे कळविले आहे. वास्तविक महापालिकेने संस्थेला याबाबत काहीच कळविले नाही. दंड झाल्याचे माहीत नाही व माफीसाठी आम्ही अर्ज केला नसल्याचा जाई—जुई संस्थेने खुलासा केला आहे. संस्थेला पूर्ण अदा केले आहे. त्यामुळे लेखा परिक्षकांच्या अभिप्रायापर्यंत तूर्त संस्थेकडून थेट थंड भरून घेता येणार नाही, अशी माहिती सहायक आयुक्त अमिता दगडे—पाटील यांनी दिली.