शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील ‘प्रिसिजन’ तीन इलेक्ट्रिक घंटागाड्या तयार करून महापालिकेला देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 12:15 IST

सामंजस्य करार : चाचणी यशस्वी झाल्यानंतर २५० गाड्या रुपांतरित करणार

साेलापूर - प्रिसिजन उद्याेग समूह तीन इलेक्ट्रिक घंटागाड्या तयार करुन महापालिकेला देणार आहे. या तीन गाड्यांची चाचणी यशस्वी झाल्यास पालिकेच्या २५० गाड्या इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित केल्या जातील. यासंदर्भातील सामंजस्य करार महापाैर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, प्रिसिजन उद्याेग समूहाचे चेअरमन यतीन शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला.

प्रिसिजन उद्याेग समूहाने डिझेलवर चालणाऱ्या प्रवासी बसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतर केले. आता पालिकेच्या डिझेलवर चालणाऱ्या घंटागाड्यांचे इलेक्ट्रिक गाड्यामध्ये रुपांतर करण्याचा मानस आहे. या गाड्यांच्या रुपांतरित करण्याचा परस्पर सहकार्य करार महापाैरांच्या दालनात झाला. या कार्यक्रमाला प्रिसिजनचे संचालक करण शहा, विराेधी पक्षनेता अमाेल शिंदे, गटनेता आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नराेटे, किसन जाधव, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक सुभाष शेजवाल, सहायक आयुक्त श्रीराम पवार आदी उपस्थित हाेते.

---

प्रिसिजनची नेदरलँड येथील इमाॅस कंपनी ट्रक, बस आणि मिलिटरी वाहनांचे पाॅवरट्रेन्स डिझाइन तयार करते. याचे उत्पादन करून पुरवठाही करते. इमॉसने युरोपात आजवर ६०० हून अधिक इलेक्ट्रिक वाहने वितरित केली. या तंत्रज्ञानाव्दारे प्रिसिजनने एक इलेक्ट्रिक बस तयार केली. एआरएआयने या बसची चाचणी प्रमाणित केली. आता तीन घंटागाड्या तयार करणार आहाेत. साेलापूरसाठी नेहमीच आमचे याेगदान राहिले आहे. हा नवा प्रयत्न आहे.

- यतीन शहा, चेअरमन, प्रिसिजन.

----

पालिकेतील घंटागाड्यांच्या इंधनासाठी दरमहा सहा काेटी रुपयांचा खर्च हाेताे. त्याशिवाय देखभाल दुरुस्तीचा खर्च वेगळा आहे. पालिकेला आणखी घंटागाड्या हव्या आहेत. नव्या गाड्या इलेक्ट्रिकच असाव्यात असा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी शाेध सुरू हाेता. यादरम्यान प्रिसिजन कंपनीच्या इलेक्ट्रिक बसची माहिती मिळाली. दाेघांनी मिळून एक करार करण्याचे ठरले. इलेक्ट्रिक वाहन हे भविष्याची गरज आहे. हे ओळखूनच हा करार केला आहे.

- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.

--

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाbusinessव्यवसाय