शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाºयांनी संविधान बदलण्याचा घाट घातलाय, जोगेंद्र कवाडे यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:10 IST

जोगेंद्र कवाडे हे सोलापूरच्या दौºयावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देदेशात सध्या अघोषित आणीबाणी लागू - प्रा. जोगेंद्र कवाडे सरकार देशातील जनतेची सपशेल फसवणूक करीत आहे - प्रा. जोगेंद्र कवाडे नागरिकांनी आता सावध होण्याची गरज - प्रा. जोगेंद्र कवाडे

सोलापूर : सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने भारतीय संविधान बदलण्याचा घाट घातला आहे. पुंजीपतीचे कर्ज माफ केले जात आहे, मात्र शेतकºयाला वाºयावर सोडले जात आहे. खºया अर्थाने हे भांडवलदारांचं राज्य असून, ते आता बदलण्याची गरज आहे, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. 

जोगेंद्र कवाडे हे सोलापूरच्या दौºयावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कवाडे पुढे म्हणाले की, २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी घोषणा केली. अनेक आश्वासने देऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आला, मात्र हे सरकार देशातील जनतेची सपशेल फसवणूक करीत आहे. 

‘अच्छे दिन’च्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला अफुची गोळी देऊन गुंगीत ठेवण्याचे काम करीत आहेत़ देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टी भारतीय संविधान बदलून देशात मनुस्मृती लागू करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. हा खूप मोठा धोका असून, नागरिकांनी आता सावध होण्याची गरज आहे. येत्या लोकसभा, विधानसभेत भाजपाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे कवाडे म्हणाले. 

रिपाइंच्या ऐक्याबाबत बोलताना कवाडे म्हणाले की, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे रामदास आठवले यांनी प्रथम ऐक्य करावे नंतर आम्ही या ऐक्याच्या सागरात सामील होऊ, अशी भूमिका स्पष्ट केली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, शहराध्यक्ष अमित कांबळे, रमेश सरवदे, लौकिक इंगळे, कपिल बनसोडे आदी उपस्थित होते. 

पक्षातून पाच जणांची हकालपट्टी...- पक्षाच्या नावावर बेकायदेशीर कृत्य करणाºया कार्यकर्त्यांना पक्षामध्ये कोणतेही स्थान नाही. बिभीषण लोंढे, अमोल गोडसे, राहुल शंके, शांतीकुमार नागटिळक आदींसह पाच जणांना पक्षातून काढून टाकत असल्याची घोषणा यावेळी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केली. यापूर्वीच या लोकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, तशी घोषणा जयदीप कवाडे यांनी सोलापुरात येऊन केली होती.

जयदीप कवाडे यांना खोटे ठरवत पुन्हा पक्षात असल्याचे सांगितले. मी सोलापुरात येऊन याची अधिकृत घोषणा करणार होतो म्हणून यावर प्रतिक्रिया दिली नाही. या कार्यकर्त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, पक्षाच्या नावाने जर काही करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही कवाडे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरJogendra kawadeजोगेंद्र कवाडे