शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सकारात्मक स्वसंवाद महत्त्वाचा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:33 IST

लोक  आपल्याविषयी काय बोलतात, यापेक्षा आपण स्वत:विषयी काय बोलतो हे जास्त महत्त्वाचे ठरते.

लोक  आपल्याविषयी काय बोलतात, यापेक्षा आपण स्वत:विषयी काय बोलतो हे जास्त महत्त्वाचे ठरते. आपली स्वत:ची प्रतिमा आपल्या मनात कशी आहे, ती सकारात्मक आहे का नकारात्मक, यावरून आपले व्यक्तिमत्त्व बनत असते. यावरूनच आपली आयुष्याची वाटचाल सुलभ किंवा कठीण होते. ‘माझे नशीबच खोटे आहे’, ‘मी दिसायला कुरूप आहे’, ‘मला सतत अपयशच येते’, ‘माझी परिस्थिती वाईट आहे’,‘हे जग चांगले नाही’, ‘माझ्या हातून काहीही होणार नाही’, या आणि यासारखे इतर नकारात्मक संवाद आपण स्वत:शी करत असूत, तर आयुष्यात चांगले काही घडण्याची आपण अपेक्षाच कशी ठेवू शकतो?. आपली सर्व शक्ती आपण नकारात्मक विचारात, संवादात खर्च करत असूत तर आपल्या हातून नवनिर्मिती होणार कशी? आपण आपली प्रगती कशी साधणार? शारीरिक व्यंगावर एखाद्या वेळेस मात करता येऊ शकेल, पण मनाच्या व्यंगाचे काय?. यावरून सकारात्मक स्वसंवादाचे महत्त्व अधोरेखित करणे गरजेचे आहे.

‘मी सर्व शक्तिमान अशा परमेश्वराची एक निर्मिती आहे, एक अंश आहे’ ‘मी कोणतेही काम माझ्यात असलेल्या अंगभूत शक्तीमुळे, आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या बळावर पूर्ण करू शकतो’. ‘माझ्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही’. ‘मी कोणत्याही आलेल्या संकटावर मात करू शकतो’. ‘मी माझी सध्याची वाईट परिस्थिती बदलू शकत्तो’. ‘मी काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्यामधली ऊर्जा वापरेन’. ‘हे जग सुंदर आहे ते अजून सुंदर करण्याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन’, ‘चांगलं दिसणं माझ्या हातात नाही, पण चांगलं बनणं माझ्या हातात आहे’, यासारखे सकारात्मक स्वसंवाद नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. असे     संवाद जर आपण साधत नसूत                तर ते जाणीवपूर्वक साधणे गरजेचे आहे.

नकारात्मक स्वसंवाद साधणारी व्यक्ती हा इतरांशी देखील नकारात्मकच बोलत असतो. त्याचा स्वभाव सतत किरकिरा बनतो. नवीन कोणत्याही गोष्टीमध्ये त्याला रस नसतो. त्याच्यासाठी आयुष्य हे सुंदर नसून कंटाळवाणे बनते. त्याची प्रगती खुंटते. तो अपयशाच्या खोल दरीत ढकलला जातो. अशा व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला असतील तर अशा व्यक्तीपासून दूर राहणे हे आपल्या हिताचे ठरते.नकारात्मक स्वसंवाद हा नकारात्मक जीवनशैलीचा परिणाम असतो की, ज्यात खालील काही घटक समाविष्ट होतात. व्यसनाधीनता, वाईट संगत, आळशी वृत्ती, सतत कामाचा ताण, विस्कळीत कौटुंबिक नातेसंबंध. सकारात्मक स्वसंवाद साधायचा असेल तर सकारात्मक जीवनशैली देखील अंगीकारणे गरजेचे असते की, ज्यात खालील काही गोष्टी समाविष्ट होतात. नियमित व्यायाम, चांगली संगत, कामाचे योग्य नियोजन, सुदृढ नातेसंबंध, एखादा छंद.

या उलट सकारात्मक स्वसंवाद साधणारी व्यक्ती इतरांशी देखील सकारात्मकच बोलते. त्याच्या अंगात एक उत्साह असतो. काहीतरी नवीन करण्याची त्याच्यात ऊर्मी असते. आपल्यातील ऊर्जा तो इतरांना देखील देतो. तो इतरांना आपल्याकडे आकर्षित करतो. आपसूकच त्याचा प्रगतीचा वेग वाढतो. तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. अशा व्यक्तीशी जवळीक साधणे , मैत्री करणे हे आपल्या हिताचे ठरते.

आपल्या विचारांना सकारात्मकतेची धार लावण्याचे कसब आपल्या अंगी येणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टी घडण्यामागचा सकारात्मकच विचार पहिल्यांदा आपल्या मनात डोकायला पाहिजे. विचार बदलायला जरी बराच अवधी लागला तरी हळूहळू हे आपल्या अंगवळणी निश्चतच पडेल.

जगणं हे सुदर बनवायचं का कंटाळवाणं, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे, आपल्या विचारात आहे. नकारात्मक विचाराकडून सकारात्मकतेकडे जाणे कधीही हिताचे ठरते. नकारात्मक स्वसंवाद जेव्हा आपण साधतो तेव्हा ही सृष्टी ‘तथास्तू म्हणते व सकारात्मक स्वसंवाद साधतानादेखील. परंतु पहिला तथास्तू आपल्यासाठी शाप बनतो तर दुसरा वरदान. असा शाप घ्यावयास कोणाला आवडेल, ‘नाही का ?- महेश भा. रायखेलकर(लेखक संगणक प्रशिक्षक आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूर