शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोटातला जीव सांभाळत पूजा अन्  यास्मीन कोरोना रुग्णसेवेत अहोरात्र कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:55 IST

राकेश कदम साेलापूर : गराेदरपणाचा काळ हा महिलांसाठी अतिशय कठीण काळ असताे. एकाचवेळी दाेन जीवांची काळजी असते. काेराेनाच्या काळात ...

राकेश कदमसाेलापूर : गराेदरपणाचा काळ हा महिलांसाठी अतिशय कठीण काळ असताे. एकाचवेळी दाेन जीवांची काळजी असते. काेराेनाच्या काळात अनेक लाेक डगमगले. मात्र, महापालिकेच्या आराेग्य केंद्रातील परिचारिका यास्मीन पठाण आणि आशा वर्कर पूजा सतारवाले यांनी गराेदर असूनही जीव धाेक्यात घालून काम केले. आजही त्यांच्यासारख्या अनेक सेविका जीव धाेक्यात घालून काम करीत आहेत. 

पूजा राजेश सतारवाले या दाराशा आराेग्य केंद्रात आशा वर्कर आहेत. एप्रिल २०२० मध्ये त्या तीन महिन्यांच्या गराेदर हाेत्या.  एप्रिल महिन्यात साेलापुरात काेराेनाचा पहिला रुग्ण आढळून आला. शहर भीतीच्या सावटाखाली हाेते. तेलंगी पाच्छा पेठ, बेगम पेठ, शास्त्री नगर, कुमठा नाका हे परिसर काेराेनाचे हाॅटस्पाॅट हाेते. या भागात आराेग्य सर्वेक्षणाचे काम सुरू केले. या काळातील अनुभव पूजा सतारेवाले यांनी लाेकमतला सांगितले. पूजा म्हणाल्या, काेराेनाची भीती आमच्या घरातील लाेकांमध्येही हाेती. गराेदर आहेस, कशाला जीव धाेक्यात घालतेस. आपल्याला काय गरज आहे, असे घरचे लाेक सांगायचे. आजूबाजूचे लाेकही मला समजावून सांगायचे, पण या काळात आमचे काम महत्त्वाचे हाेते. म्हणून मी काम करीत राहिले. आम्हाला दिवाळीपर्यंत एक दिवसाची सुटी मिळाली नाही.

आज मला एक महिन्याची मुलगी आहे. मुलीला घरी ठेवून दाेन-दाेन तास मी फिल्डवर जाते. रामवाडी आराेग्य केंद्रात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या आज सहा महिन्यांच्या गराेदर आहेत. पूर्वी त्यांना केवळ ओपीडी आणि लसीकरणाचे काम हाेेते. काेराेना आल्यानंतर बाधित रुग्णाच्या संपर्कातील लाेकांना शाेधणे, घराेघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, काेमऑर्बीड व्यक्तींच्या आराेग्य माहिती घेणे हे नवे काम सुरू झाले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ओपीडी केल्यानंतर दुपारी उन्हातच त्या रामवाडी, विजापूर नाका झाेपडपट्टी, जुळे साेलापूर या भागात आराेग्य सर्वेक्षणासाठी फिरतात. काेराेनाबाधित रुग्णाच्या घरी जाऊन संपर्कातील चाचण्यांसाठी पाठविणे, क्वारंटाइन करणे हे काम करतात. पूजा सतारवाले आणि यास्मीन पठाण यांच्यासारख्या अनेक आराेग्यसेविकांनी जीव धाेक्यात घालून काम केले आहे. 

डगमगलो नाही!गराेदरपणाच्या काळात विश्रांतीसाेबत मानसिक आधारही लागताे. यास्मीन पठाण, पूजा सतारवाले यांना एक दिवसाचीही सुटी मिळाली नाही. आराेग्य सर्वेक्षण करताना लाेकांच्या शिव्या ऐकाव्या लागल्या. नगरसेवकांनी धमक्या दिल्या. लाेक अंगावर धावून आले; पण आम्ही डगमगलाे नाही. भीतीपाेटी लाेक आम्हाला बाेलत हाेते, असे या दाेघी आवर्जून सांगतात.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPregnancyप्रेग्नंसी