शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा बाजार समितीमध्ये डाळिंबाला मिळाला प्रतिकिलो ५११ रुपये विक्रमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 14:47 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा. चेअरमन बबनराव आवताडे व श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब लिलावामध्ये बुधवार १८ नोव्हेंबर २०२० रोजी डाळिंबास प्रति किलो ५११ रुपये विक्रमी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून डाळिंब खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्याचे बाजार समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

निर्यातक्षम डाळिंबापेक्षा दुसऱ्यांदा एवढा जास्त दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. मोहन माळी या आडत दुकानी डाळिंब सौदयात रावसाहेब लवटे (रा.जत) या शेतकऱ्याच्या डाळिंबाला ५११ रु खरेदीदार राम बाबर (सांगोला) यांनी खरेदी केला, तर कुमार चिकोडी (रा.जत) व दत्ता धाइंगडे (रा.वाकी ता. सांगोला) या शेतकऱ्याला ५०२ रु खरेदीदार आकाश गुजर यांच्याकडून दर मिळाला. तर आनंद लवटे व सुरेश माळी (रा. जत) यांना दर मिळाला. आठवड्यातील प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवार दुपारी ४ वाजता डाळिंब सौदे लिलाव सुरू असतात यावेळी बाजर समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, उपसभापती प्रकाश जुंदळे, सचिव सचिन देशमुख, मोहन माळी, रामचंद्र बाबर, आकाश गुजर, विनायक शेंबडे, भानुदास सलगर, दत्तात्रय शिंदे, विनायक आवताडे इत्यादी उपस्थित होते.

मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने डाळिंब सौदे लिलाव सुरु केले. या सौदे लिलावत सोलापूर, पंढरपूर, सांगोला, जत, मोहोळ, कर्नाटक या भागातुन येणारी आवक वाढली आहे. मंगळवेढा मार्केट मधील खरेदीदार माल खरेदी करून दिल्ली, गुजरात, मुंबई, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, आसामला माल पाठवत असल्याने डाळिंबास चांगला दर भेटत आहे. यामुळे शेतकऱ्याचे हित होत असून शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारagricultureशेती