शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

क्यूआर कोडद्वारे शोधता येणार मतदान केंद्र, मतदान वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेचा उपक्रम

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 28, 2024 20:24 IST

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार माढा लोकसभा मतदारसंघाकरिता येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेच्यावतीने क्यूआर कोडचा अभिनव उपक्रम राबविला आहे. यामुळे मतदारांना घरबसल्या क्यूआर कोड स्कॅन करून मतदान केंद्र शोधता येणार आहे.निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार माढा लोकसभा मतदारसंघाकरिता येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. यादृष्टीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे प्रयत्नशील असून, स्वीप कार्यक्रमांतर्गत सर्व स्तरावर जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सांगोला नगर परिषदेकडून सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता अभिनव उपक्रम राबविला आहे. याअंतर्गत सांगोला विधानसभा क्षेत्रातील मतदारांना घरबसल्या क्यूआर कोड स्कॅन करून मतदान केंद्र शोधणे सोईस्कर झाले आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २९९ मतदान केंद्र असून, एकूण ३,१२,४८८ मतदार आहेत.एका क्लिकवर माहिती क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदार इपिक क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाइल क्रमांक यापैकी एकाची माहिती भरून एका क्लिकवर आपल्या मतदान केंद्राची माहिती त्वरित उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याचा लाभ घेता येणार आहे.सांगोला शहरात एकूण ३० मतदान केंद्रे असून, शहरी भागामध्ये मतदान केंद्रामध्ये होणाऱ्या वारंवार बदलाच्या अडचणी लक्षात घेता शहरी भागातील मतदाराला मतदान केंद्र शोधण्यास अडचणी येतात. शहरी भागातील मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यासाठी क्यूआर कोडचा विशेष फायदा होईल.- सुधीर गवळी, मुख्याधिकारी तथा प्रशासक, सांगोला

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान