शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

सोलापूर दक्षिणमध्ये घटला मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 11:43 IST

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ; उमेदवारास फारशी चुरस नसल्याचे जाणवले !

ठळक मुद्देसोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद ३ लाख १० हजार २७२ पैकी एक लाख ६० हजार ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला८८ हजार ७८३ पुरुष तर ७२ हजार ११६ स्त्री मतदारांनी मतदान केले

नारायण चव्हाण

सोलापूर : विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अन्य मतदारसंघाच्या तुलनेत निचांकी मतदानाची नोंद झाली आहे़ पावसाचा फटका मतदानाला बसला असून, उमेदवारात फारशी चुरस नसल्यामुळे मतदान घटल्याची चर्चा आहे.

जिल्ह्याच्या अन्य मतदारसंघापेक्षा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद आहे. सरासरी ५१़८६ टक्के मतदान झाले आहे. ३ लाख १० हजार २७२ पैकी एक लाख ६० हजार ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८८ हजार ७८३ पुरुष तर ७२ हजार ११६ स्त्री मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदारांची संख्या स्त्रियांपेक्षा अधिक राहिली आहे. गतवेळच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून येते.

निवडणुकीत फारशी चुरस नव्हती अशी सुरुवातीपासून मतदारसंघात चर्चा होत राहिली़ साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा निरुत्साह होता. मतदारांना घरातून मतदान केंद्रात आणण्यासाठी राजकीय पक्षांची यंत्रणा अभावानेच दिसली. 

भाजप-सेना -शिवसंग्राम-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबा मिस्त्री तथा मौलाली सय्यद, एमआयएमचे अमित अजनाळकर आणि वंचित आघाडीचे युवराज राठोड यांच्यात चौरंगी लढत असली तरी महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारातच खरी चुरस होती. आघाडीचे बाबा मिस्त्री मतदारसंघात नवखे असल्याने त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या़ त्यात काँग्रेसच्याच नेत्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करीत उमेदवाराला अपशकून केल्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. काँग्रेसमध्ये नाराजी तर राष्ट्रवादी गलितगात्र झाल्याचे प्रचारात स्पष्टपणे जाणवत होते. 

भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात भलतीच रंगतदार वळण घेत राहिली. एकाकी लढणाºया बाबा मिस्त्रींना काँग्रेसच्या श्रेष्ठींनी बळ दिले़ नाराज बाळासाहेब शेळके प्रचारात उतरले़ समर्थकही उघडपणे बाहेर पडले. ग्रामीण भागात बाबा मिस्त्री यांना वोट अन् नोट देऊन प्रचारात रंगत आणली. शेवटच्या टप्प्यात ही लढत ग्रामीण भागात चुरशीची झाली. लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळण्याची अपेक्षा भाजपकडून केली जात होती, मात्र अखेरच्या टप्प्यात असंतुष्ट कार्यकर्ते, पक्षांतर्गत गटबाजी या चर्चेने काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारल्याचे दिसून आले.

बाबा मिस्त्री शहरी चेहºयाचे, राजकीयदृष्ट्या फारसे परिचित नसल्याने भाजपच्या प्रचारात यांच्याविरोधात प्रभावी मुद्दे मांडता आले नाहीत़ सुभाष देशमुख यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवर लक्ष केंद्रित केले़ याउलट मिस्त्रीसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुभाष देशमुखांना घेरण्याची एकही संधी सोडली नाही. लोकमंगलचा गैरव्यवहार, ऊसबिलाच्या रकमा मिळाल्या नाहीत, खोट्या विकासकामांचा डोलारा उभारला आदी मुद्दे प्रचारात घेऊन देशमुखांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जातीय समीकरणे मांडली गेली.सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक ग्रामीण भागात अत्यंत चुरशीची झाली़ गटातटाच्या राजकारणाचे पडसाद प्रचार सभातून उमटले़

नोकरदार, शेतकºयांनी फिरविली पाठ- पावसामुळे सकाळपासून मतदारांना घराबाहेर पडता येत नव्हते. ११ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती़ त्यानंतर उघडीप मिळाली आणि मतदार घराबाहेर पडले. शहरी मतदारांनी दुपारी मतदान केंद्रे गजबजून गेली तर ज्यांची नावे ग्रामीण भागाच्या मतदार यादीत समाविष्ट होती अशा शहरी मतदारांनी गावांकडे जाण्याचे टाळले़ त्याचा मतदानावर परिणाम झाला. विशेषत: नोकरदार, शेतकरी यांनीच पाठ फिरवली. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण