शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

युतीवरच सांगोल्यातील महायुतीच्या इच्छुकांचे राजकीय भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 10:08 IST

गणपतराव देशमुख, दीपक साळुंखे यांनी बांधली नव्याने मोट, शेकाप अन् राष्ट्रवादीला आघाडीचाच फायदा

ठळक मुद्देभाजपच्या दोघांसह शहाजीबापूंनी पिंजून काढला मतदारसंघलोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यात माढा मतदारसंघात नुकतेच मतदान झालेलोकसभा निवडणुकीच्या व्यासपीठावरून तालुक्यातील इच्छुक नेतेमंडळींनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

अरूण लिगाडे

सांगोला : विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या व्यासपीठावरून सांगोला विधानसभेसाठी शेकापचे आ. गणपतराव देशमुख, माजी आ. शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे या इच्छुकांनी जाहीर सभा, प्रचारसभेतून जनतेसमोर जाऊन साखरपेरणी केल्याचे दिसून आले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यात माढा मतदारसंघात नुकतेच मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या व्यासपीठावरून तालुक्यातील इच्छुक नेतेमंडळींनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली विधानसभेची निवडणूक शेकापचे आ. गणपतराव देशमुख विरुद्ध शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्यात होण्याची शक्यता असली तरी आजवर गणपतराव देशमुख यांना निर्णायक मते मिळवून देणारे दीपक साळुंखे यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

इतकेच काय, गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोशल मीडियावरून यंदाच्या निवडणुकीत दीपक साळुंखे उतरणार असल्याचे मेसेज व्हायरल करताना दिसतात़ तसे झाले तर आ. गणपतराव देशमुख यांना याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. 

सांगोला तालुक्यात पुन्हा एकदा शेकापचा झेंडा फडकवण्यासाठी पूर्वीच्या निवडणुकीप्रमाणे आ. देशमुख यांना फारसे कष्ट होणार नाहीत. कारण शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर या दोन नेत्यांचे वर्चस्व आहे. शेकापचे आ़ गणपतराव देशमुख हे नेहमीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, गट मेळाव्याच्या माध्यमातून सतत संपर्कात असतात़ विधानसभेच्या पराभवानंतर अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनीही सांगोला तालुक्यात कार्यकर्त्यांशी जनसंपर्क वाढवला असून, विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावतात. भाजपचे पराभूत उमेदवार श्रीकांत देशमुख हेही तालुक्यात सतत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जनतेच्या संपर्कात आहेत. 

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात आ. गणपतराव देशमुख यांनी लोकसभेला आपण राष्ट्रवादीला मदत करणार आहोत तर विधानसभेला राष्ट्रवादी आपणाला मदत करणार आहे, असे सूचक वक्तव्य केल्याने विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा लोकसभेच्या व्यासपीठावरूनच सुरू झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, नगरपालिका निवडणुकीनंतर झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या लक्षणीय यशामुळे आत्मविश्वास बळावलेला शहाजीबापू पाटील यांचा गटही तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाला आहे. तालुक्यातील तरुण पिढी शहाजीबापूंना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी कामाला लागली आहे. २०१४ च्या निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपची युती तुटल्याने त्याचा फटका सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांना बसला होता; तर भाजपचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांनी निर्णायक १४ हजार मते मिळवून शहाजीबापूंना विजयापासून रोखले होते. 

युतीवरच महायुतीच्या इच्छुकांचे राजकीय भवितव्य

  • - गत निवडणुकीत संभाजी आलदर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आता त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर भाजपच्या राजश्री नागणे याही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या सर्वांची भूमिका महायुतीच्या उमेदवाराचे राजकीय भवितव्य ठरविणारी असेल. 
  • - लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठीही शिवसेना-भाजप युती कायम राहिल्यास व महायुतीने विधानसभेसाठी सांगोल्यातून बंडखोरी रोखल्यास २०१९ ला होणाºया विधानसभा निवडणुकीचे सांगोला तालुक्यातील कदाचित चित्र वेगळे असेल.
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढा