शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम

By admin | Updated: January 28, 2017 12:28 IST

मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम

मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरमअशोक कांबळे : मोहोळ आॅनलाईन लोकमतफेबु्रवारीमध्ये होणाऱ्या मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यात सर्वच पक्षांतील राजकीय वातावरण तापले आहे़ प्रत्येक पक्षाच्या बैठका, मुलाखती, चांगला उमेदवार कोण, मालदार उमेदवार कोण याची चाचपणी पक्षप्रमुख करीत आहेत़ माजी आमदार राजन पाटील यांची एकहाती सत्ता असलेल्या मोहोळ तालुक्यात विरोधकांनी राजन पाटील यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी चंग बांधला आहे़ दरम्यान, मोहोळ तालुक्यात सर्व विरोधकांचा एकच विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या हातात असलेली एकहाती सत्ता थोपविण्याची तयारी सर्व विरोधक करत आहेत़ यासाठी भीमा परिवाराचे धनंजय महाडिक, माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह अन्य समविचारी पक्ष व संघटना एकत्र येऊ पाहत आहेत़ त्यात शिवसेना व भाजपाही तयार आहे़ परंतु आघाडीत प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर आपापल्या चिन्हावर निवडणुका लढवाव्यात, अशी भूमिका सेना व भाजपा कार्यकर्ते घेत आहेत़परंतु भीमा परिवाराचे धनंजय महाडिक यांनी आघाडी करायची असेल तर सर्व जागा आघाडीच्या चिन्हावरच लढवाव्या लागतील, अशी भूमिका घेतली आह़े़ ज्यांना यायचे आहे त्यांनी या अनुषंगानेच महाआघाडीत सामील व्हावे, या निर्णयात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मत काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आह़े़ त्यामुळे महाआघाडीला ब्रेक लागला असून, आता सेना-भाजपा अंतिम क्षणी कोणता निर्णय घेणार तर इतर संघटना काय पाऊल उचलणार, यावरच महाआघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे़मोहोळ जि. प़ व पं़ स़ ची निवडणूक लागली असून, गेली २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता रोखण्यासाठी सेना-भाजपा व अन्य मित्रपक्ष लढत आले आहेत. परंतु आजतागायत विरोधकांना यश मिळाले नाही़ राष्ट्रवादीची एकहाती सत्ता अबाधित ठेवण्यात राजन पाटील यशस्वी ठरले आहेत़राजन पाटील यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष मनोहर डोंगरे असायचे, परंतु आता होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर राजन पाटील व मनोहर डोंगरे यांच्यातच उभी फूट पडली आहे़ त्यामुळे आता ही निवडणूक राजन पाटील व मनोहर डोंगरे या दोघांच्या अस्तित्वाची निवडणूक ठरणार आहे़ या पार्श्वभूमीवर माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराबरोबर आघाडी केली आहे़ या आघाडीत धनंजय महाडिक, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कॉगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील, जनहित शेतकरी संघटनेचे भैय्यासाहेब देशमुख हे आहेत़तालुक्यातील आता सर्वच विरोधकांचा ऐक्य विरोधक म्हणून राजन पाटील यांचा राष्ट्रवादी पक्ष बनला आहे़ या राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भीमा परिवारासोबत आघाडी करण्यासाठी सर्वच जण तयार आहेत़ या सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत बैठका झाल्या, परंतु सेना-भाजपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आघाडी करुन वाट्याला येणाऱ्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची भूमिका घेतली आहे़ त्यावर एकमत न झाल्याने अजून तरी आघाडीचे सुत जमले नाही़ आघाडी होणार का, असा प्रश्न अनुत्तरित असतानाच या आघाडीतील नेते, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांनी आघाडीत कोणी बी येवो, आमचे दरवाजे खुले आहेत़ परंतु आमच्या आघाडीच्याच चिन्हावर होणारी निवडणूक लढवावी लागेल, यात कोणताही बदल अथवा तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याने मोहोळ तालुक्यातील महाआघाडीचे घोडे वेशीतच थांबले आहे़ भीमा परिवाराच्या या भूमिकेवर आता सेना-भाजपा काय निर्णय घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे़