शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील पोलिसावर गोळीबार; तिघांना पाच वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 12:51 IST

सोलापूर : सोरेगाव येथील एका दवाखान्याकडे जाणाºया रोडवर पोलिसावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणी तिघांना जिल्हा न्यायाधीश यु.बी. हेजीब यांनी ...

ठळक मुद्देया प्रकरणात सहायक सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश जन्नू यांनी १३ साक्षीदार तपासलेसोरेगाव येथील एका दवाखान्याकडे जाणाºया रोडवर पोलिसावर गोळीबारपोलिसावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणी तिघांना जिल्हा न्यायाधीश यु.बी. हेजीब यांनी पाच वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली

सोलापूर : सोरेगाव येथील एका दवाखान्याकडे जाणाºया रोडवर पोलिसावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणी तिघांना जिल्हा न्यायाधीश यु.बी. हेजीब यांनी पाच वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

काशिनाथ मल्लप्पा गोळगी, गौडप्पा संगप्पा बिराजदार, शंकरलिंग गोग्यप्पा जेऊर अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोरेगाव परिसरात बेकायदा पिस्तूल विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोरेगाव येथील एका दवाखान्याकडे जाणाºया कच्च्या रोडवर गस्त घातली, तेव्हा आरोपी कोणाचीतरी वाट पाहात होते.

पोलिसांनी आरोपींना गराडा घातला असता, सर्वजण पळून जाण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाठलाग करून काशिनाथ मल्लप्पा गोळगी याला पकडताना झटापट झाली. काशिनाथ गोळगी याने कंबरेला असलेली पिस्तूल बाहेर काढली. पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिर्के यांनी त्याचे दोन्ही हात पकडण्याचा प्रयत्न केला असता काशिनाथ गोळगी याने पिस्तूलमधून एक गोळी झाडली. गोळी पोलीस गणेश शिर्के यांच्या डाव्या पायाच्या मांडीला घासून गेली. गणेश शिर्के हे जखमी झाले होते. 

या प्रकरणात सहायक सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश जन्नू यांनी १३ साक्षीदार तपासले. फिर्यादी गणेश शिर्के, पंच व इतर साक्षीदार तसेच डॉ. राहुल राऊत, तपासी अंमलदार शंकर जिरगे व सक्षम अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले. तर आरोपीतर्फे अ‍ॅड. नागेश खिचडे व अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.

अशी सुनावली शिक्षा...- आरोपी नं.-१ काशिनाथ गोळगी याला भादंवि ३३२ अन्वये दोषी धरून १ वर्ष सक्तमजुरी तसेच ५00 रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी, आरोपी नं.४ शंकरलिंग जेऊर याला भादंवि ३३२ अन्वये दोषी धरून ६ महिने सक्तमजुरी तसेच प्रत्येकी ५00 रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी, काशिनाथ गोळगी, गौडप्पा बिराजदार, शंकरलिंग जेऊर यांना ३५३ अन्वये दोषी धरून २ वर्षे सक्तमजुरी तसेच प्रत्येकी ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  काशिनाथ गोळगी व गौडप्पा बिराजदार यांना भारतीय हत्यार कायदा कलम ७ अन्वये दोषी धरण्यात येऊन कलम २५.१ए अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली व दंडाची रक्कम न भरल्यास ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस