शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील आंदोलक घंटागाडी कर्मचाºयांवर पोलीसांचा लाठीमार, दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:00 IST

आठ महिन्यांपासूनचे मानधन द्यावे या मागणीसाठी मनपात आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचाºयांना पोलीसांनी लाठीमार करून हुसकावून लावले़ मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला़ 

ठळक मुद्देघंटागाडी कर्मचाºयांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाला कोणतेही कल्पना न देता काम बंद आंदोलन सुरू केलेघंटागाडी कर्मचाºयांना कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्याचा प्रस्ताव आयुक्त अविनाश ढाकणे यांनी तयार केला़घंटागाडी कर्मचाºयांचे मानधन सहा महिन्यांपासून थकले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : आठ महिन्यांपासूनचे मानधन द्यावे या मागणीसाठी मनपात आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचाºयांना पोलीसांनी लाठीमार करून हुसकावून लावले़ मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला़ घंटागाडी कर्मचाºयांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाला कोणतेही कल्पना न देता काम बंद आंदोलन सुरू केले आहे़ त्यामुळे प्रशासनाने सोमवारी सकाळी कायम चालकांच्या मदतीने घंटागाड्या व आरसी बाहेर काढून शहरातील कचरा उचलण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचाºयांनी हातात दांडके घेऊन कर्मचाºयांना दमदाटी केली़ दहशती वातावरणामुळे कचरा गाड्या बाहेर निघू शकल्या नाहीत़ त्यामुळे मंगळवारी कचरा संकलन करण्यासाठी अप्पर आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती़ ठरल्याप्रमाणे महानगरपालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला होता़ यावेळी श्रीशैल गायकवाड यांच्यासह घंटागाडी कर्मचारी महापालिकेत आले़ याचवेळी दोघांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोलीसांनी आंदोलन कर्मचाºयांनी दादागिरी मोडीत काढण्यासाठी लाठीचार्ज केला़ आंदोलन करण्यासाठी एकत्र आलेले घंटागाडी कर्मचारी सैरावैरा पळत सुटले़ त्यावेळी पोलीसांनी पाठलाग करून लाठीचा प्रसाद दिला़ -------------------काय आहे समस्या़....घंटागाडी कर्मचाºयांना कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्याचा प्रस्ताव आयुक्त अविनाश ढाकणे यांनी तयार केला़ हा प्रस्ताव स्थायी समितीकडे प्रलंबित आहे़ त्यामुळे घंटागाडी कर्मचाºयांचे मानधन सहा महिन्यांपासून थकले आहे़ हा निर्णय झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाºयांना मोठी रक्कम मिळणार आहे़ ही रक्कम तातडीने द्यावी म्हणून घंटागाडी कर्मचाºयांनी आडमुठी भूमिका घेतली आहे़ ऐन यात्रेच्या तोंडावर कचरा संकलन बंद केल्याने शहरात कचरा साठला आहे़ या कर्मचाºयांबाबत आता आयुक्त अविनाश ढाकणे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे़  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका