शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; एक ठार, एक जखमी

By appasaheb.patil | Updated: February 9, 2023 17:28 IST

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.

सोलापूर : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील सरकारी पोलिस गाडीचा आणि मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला व एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात नाझरे गावाजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गाड्यांचा ताफा नाझरे गावामधून सांगोल्याकडे जात असताना नाझरे गावच्या जिल्हा मार्गावरील अंतर्गत रोडवर आमदार शहाजी पाटील यांच्या ताफ्यामधील सरकारी पोलीस स्कार्पिओ गाडी क्रमांक M H 13 DM 1940 आणि  मोटारसायकल क्रमांक MH 45 AG 6330  या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला. 

या अपघातात मोटारसायकलस्वार अशोक नाना वाघमारे (वय 50, रा. माडगूळे. ता. आटपाडी, जि. सांगली) हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेले नाना अमूने हे (रा. एकतपुर, ता. सांगोला)  गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच महामार्गाच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात